आरोग्य व शिक्षण
Trending

तरूण वयातील हार्टअटॅक एक गंभीर समस्या.हार्टअटॅक ची लक्षणे,उपाय,प्रथमोपचार पध्दती

(संतोष औताडे – मुख्य संपादक,नेवासा ) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर (आपदा मिञ )  दिनांक -11/03/2023

भारतात आजकाल हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. धावपळीच्या जीवनात खाण्याच्या सवयी मधील बदल हा महत्वाचा भाग आहे. आपल्या शरीरात रक्त शुद्ध करण्याचे यंत्र म्हणजे हृदय होय.

अनेक नव नवीन हृदयाचे आजार आता माणसाला होत आहेत.
एका संशोधना दरम्यानच्या सर्व आकडेवारी वरून असे दिसून आले आहे की, भारतात हृदय विकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, यात तरुण मुलेव मुली यांचा समावेश आहे. वास्तविक, बऱ्याच लोकांना हृदय. विकाराचा झटका येण्याची सुरुवातीची लक्षणे समजत नाहीत आणि रूग्णालयात नेईपर्यंत जीव वाचवण्या इतके प्राथमिक उपचार त्यांना मिळत नाहीत. यामुळे, बर्‍याच वेळा रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर बनते

आणि कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो. आपल्या कुटूंबाला कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेपासून वाचवण्यासाठी हृदय विकाराची लक्षणे1)छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना, 2)छातीत दुखणे, ३)हात, जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटात दुखणे, 4)घाम येणे.चक्कर येणे किंवा चिंताग्रस्त होणे, श्वास लागणे, 5)मळमळणे आणि खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, 6)अशक्तपणा वाटणे , भीती वाटते,7) कोरडा खोकला येणे. इत्यादी लक्षणे दिसू शकतात. हार्ट अटॅक च्या वेळी मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे चक्कर येऊ लागतात मात्र कधीकधी वेदना खूपच जोरात होतात, तर कधीकधी सौम्य असतात किंवा जाणवतच नाहीत. परंतु, इतर लक्षणांसह आपण त्याचा आधीच अंदाज लावू शकता. प्रथमोपचार म्हणजे काय जर सदर व्यक्ती शुद्धीत असेल, तर ताबडतोब त्यांना 300 मिलीग्राम ) अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या देणं. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवणे आवश्यक आहे.

हे रक्त पातळ करण्यासाठी महत्त्वाचे आहे. कधीकधी रक्ताची गुठळ्या होणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनू शकते. जर असे काही झाले, तर त्याला आराम मिळेल. परंतु यासह, रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा


.CPR म्हणजे काय- पद्धत जर रुग्ण बेशुद्ध पडला असेल तर ताबडतोब त्याला सपाट ठिकाणी झोपवा. नंतर त्याच्या नाकाजवळ बोटांनी किंवा कानांनी त्याचा श्वास तपासा. शिवाय नाडी देखील तपासा.श्वास किंवा नाडी येत नसेल तर ताबडतोब सी पी आर द्या. यासाठी आपला डावा हात सरळ ठेवा आणि उजवा हात त्याच्या वर ठेवा आणि बोटांनी लॉक करा. यानंतर, आपले हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी आणा आणि आपल्या सर्व ताकतीनिशी रुग्णाची छाती दाबा. लक्षात ठेवा की, आपल्याला दर मिनिटाला 100 कॉम्प्रेशन्स द्याव्या लागतील, ही क्रिया रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत करवी लागेल. CPR दिल्या नंतर पेशंटला झोपण्याची पद्धत

रुग्णाची छाती दाबा आणि प्रत्येक 25-30 वेळा रुग्णाला तोंडाद्वारे ऑक्सिजन द्या. तोंडाद्वारे ऑक्सिजन देताना त्या व्यक्तीचे नाक बंद करा. कॉम्प्रेशन दरम्यान, रुग्णाच्या छातीच्या हाडात किंवा बरगड्यांमध्ये कोणतीही समस्या नसल्याची खात्री करून घ्या,आशा प्रकारे हृदयविकाराचा झटका आलेल्या माणसाचे प्राण वाचवू शकता. *लहान मुलांना CPR कसा द्यावा- लहान किंवा अल्पवयीन मुलांना हार्ट अटॅक आला तर त्यांना CPR देण्यासाठी वेगळी पध्दत आहे.सर्वप्रथम बाळाला टणक आणि सपाट पृष्ठभागावर ठेवा. दोन बोटांनी बाळाच्या छातीचा मध्य भाग पहा. दोन निप्पल्सच्या मध्ये ही भाग असेल. या भागाजवळ बोटं थोडी खोल टाका. (सुमारे छातीच्या ⅓ जाडी खाली) हे सुमारे प्रतिमिनिट 100 इतक्या प्रमाणात प्रेस करा. बाळ बेशुद्ध आहे का ? हे तपासून पहा. त्यानंतर हाताच्या बोटांनी बाळाच्या तळव्यावर हलके झटके मारा. कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यास तात्काळ आपत्कालीन क्रमांकावर फोन फिरवा. शुद्धीत असल्यास नाडी तपासा. काखेमध्ये बोटं घालून तपासून पहा त्याचे पल्स रेट चालू आहेत का ? श्वास, नाडी काहीच चालू नसल्यास सीपीआर ची मदत घेऊ शकतो. आशा लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर कार्डिअॅक अरेस्ट येण्याची शक्यता असते. यामुळे काही सेकंदात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये
रुग्णांकडे जास्त वेळ नसतो.


प्रस्तावनासंतोष औताडे (पञकार  ) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर (आपदा मिञ ) 9764406977, 9921086795

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे