जीवनात शिस्तीला फार महत्त्व आहे शिस्तीचे पालन करा, स्वप्नपूर्ती नक्की होईल- पो.नि धनंजय जाधव
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -13/09/2024
*”जीवनात शिस्तीला फार महत्त्व आहे”*
*”आयुष्याच्या कल्याणासाठी शिस्तीशिवाय पर्याय नाही”*
*”कठोर मेहनतीशिवाय जीवनाचे सार्थक नाही”*
*”शिस्तीचे पालन करा, स्वप्नपूर्ती नक्की होईल”*”स्वतःच बनवलेल्या कायद्याचे स्वतः पालन करा”*-
सविस्तर माहिती- भानसहिवरे येथील बेल्हेकर शिक्षण संस्था येथे आज पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव पोलीस ठाणे नेवासा यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेमध्ये शिक्षण घेणारे 1100 ते 1200 विद्यार्थी उपस्थित होते.
बेल्हेकर शिक्षण संस्था येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशाची प्रथमता आरती उतारण्यात आली. त्या नंतर बेलेकर शिक्षण संस्था येथे विविध विभागातील शिक्षण घेणारे उपस्थित असणाऱ्या 1200 मुले मुली यांना मार्गदर्शन केले.
जाधव यांनी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आपला स्वतःचा जीवनपट विद्यार्थ्यां समोर मांडून त्यांच्या मनातील न्यूनगंड कमी केला, विद्यार्थ्यांना त्यांच्या असलेल्या सद्दगुणांची जाणीव करून दिली. त्यानंतर करिअर, किशोर वयात संतुलन कसे साधावे, कायदे निर्मिती प्रक्रिया, सोशल मीडियाचा मोजका वापर कसा करावा, जीवनात मित्र कसा निवडावा, जीवनात मित्र कोणाला बनवावे, सायबर गुन्हे, दामिनी-निर्भया पथके, नवीन कायदे, डायल _112 आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, पोलीस कारवाई व चारित्र्य पडताळणी इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी टाळ्यांच्या गजरामध्ये उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या मनात घोळणाऱ्या शंका-कुशंकाना प्रश्न उत्तराच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली त्यास जाधव यांनी समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले.
कार्यक्रमाच्या शेवटी बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे शाल श्रीफळ देऊन आभार मानण्यात आले.
या प्रसंगी बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या रंजना बेल्हेकर अभिषेक बेल्हेकर प्राचार्य व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.