गुन्हेगारी
Trending

तीसगाव येथील तरुणाचा गोळी झाडून खून मृतदेह सापडला प्रवारासंगम येथील प्रवारा नदी पात्रात.

संतोष औताडे- मुख्य संपादक.               दिनांक-06/11/2024


*”तिसगावच्या युवकाचा गोळी झाडून खून”* ?

*तिसगावच्या युवकाचा संशयित मृतदेह प्रवरा नदीत**”तिसगावच्या युवकाचा अज्ञात कारणावरून खून”* ?

सविस्तर माहिती- तिसगाव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर येथील राहणाऱ्या कल्याण देविदास मरकड या व्यक्तीचा मृतदेह प्रवरासंगम येथे प्रवरा नदीच्या पात्रात सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मिळून आला होता.
प्रवरा नदीत एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याबाबत नागरिकांनी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांना माहिती दिली होती. जाधव यांनी पोलिसांना तातडीने घटनास्थळी पाठवले होते. मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर कपाळावर खोल भोक असलेली जखम दिसून आल्याने सदर युवकाचा खून झाल्याचा दाट संशय निर्माण झाला. तपासाची चक्रे वेगाने फिरवुन सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत असता तिसगाव येथील राहणारा कल्याण मरकड हा व्यक्ती 1 नोव्हेंबरच्या रात्री पासून गायब झाला असून या बाबत त्याचा भाऊ प्रसाद मरकड रा. तिसगाव याने पोलीस ठाणे पाथर्डी येथे मनुष्य मिसिंग क्र. 129/2024 अन्वये नोंद केली असल्याचे दिसून आले. नेवासा पोलिसांनी मृतकच्या नातेवाईकांशी तातडीने संपर्क केला. या घटनेबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे अकस्मात मयत नोंद करण्यात आला होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रथम ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे आणण्यात आला परंतु कपाळावर खोल भोक असलेली जखम असल्याने सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे पाठवण्यात आला होता, परंतु सदरची जखम ही एखाद्या अग्नीशास्त्राने केली असावी असा दाट संशय आल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालय संभाजीनगर येथे पाठवण्यात आला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव श्री. सुनील पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री. वैभव कल्लूबर्मे, पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांना तपासाबाबत बारकाईने सूचना दिल्या. दरम्यान या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी देखील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथके रवाना केली आहेत. सदर घटनेचा उलगडा लवकरच करू असा विश्वास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा दिनेश आहेर यांनी व्यक्त केला आहे.

कल्याण मरकड याचा खून झाल्या बाबत मृतकाचा चुलत भाऊ प्रसाद मरकड याने रात्री उशिरा 1. पंकज राजेंद्र मगर 2. ईरशाद जब्बार शेख दोन्ही रा. तिसगाव यांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे