भिंगार येथुन ८ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणारा आरोपी २४ तासाचे आत जेरबंद.स्थानिक. गुन्हेशाखेची कारवाई.
संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक : -० ९ / ०५ / २०२२
भिंगार येथुन ८ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणारा आरोपी २४ तासाचे आत जेरबंद.स्थानिक. गुन्हेशाखेची कारवाई.
सविस्तर माहिती- दिनांक ०८/०५/२०२२ रोजी फिर्यादी श्री . परसराम गुलाब क्षेत्रे वय ३१ , रा केदारेवस्ती , शांतीनगर , सोलापुर रोड , अहमदनगर यांनी त्यांचा मुलगा नामे आश्वीन परसराम क्षेत्रे वय ८ वर्षे हा लहान मुला बरोबर खेळत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी मुलास पालकांच्या कायदेशिर रखवालीतुन पळवून नेले आहे . सदर घटने बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. ९ ८८ / २०२२ भादविक ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि / श्री . अनिल कटके , स्थागुशा अहमदनगर यांना मुलाचा व अपहरणकर्त्याचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . पथकातील अधिकारी व अंमलदार अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत असताना पोनि / अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर बातमी मिळाली कि , सदर मुलाचे अपहरण त्यांचे नात्यातील नागेश भिंगारदिवे याने केलेले असुन तो स्टेटबॅक चौकात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील पोसई / सोपान गोरे , पोहेकॉ / दत्तात्रय हिंगडे , दिनेश मोरे , संदीप घोडके , देवेंद्र शेलार , पोना / शंकर चौधरी , विशाल दळवी , दिपक शिंदे , रवि सोनटक्के , पोकॉ / रोहित येमुल व चापोहेकॉ / चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून आरोपींचा स्टेट बँक चौकात शोध घेत असतांना एक इसम संशयीत रित्या फिरतांना दिसला त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी करता त्याने त्याचे नाव नागेश चंद्रभान भिंगारदिवे , वय ३५ , रा . दरेवाडी , अहमदनगर असे असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवुन अपहरत मुलगा नामे आश्वीन परसराम क्षेत्रे यांचे अपहरणा बाबत चौकशी करता त्याने अपहरण केल्याची कबुली देवुन सदर अपहरण केलेला मुलास दौंड रेल्वे स्टेशन येथे पुण्याकडे जाणारे रेल्वेमध्ये सोडुन निघुन आलो अशी माहिती दिली . लागलीच विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पुणे रेल्वेस्टेशन येथे जावुन अपहरत मुलाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आश्वीन परसराम क्षेत्रे , वय ०८ वर्षे , रा . केदारेवस्ती , शांतीनगर , सोलापुर रोड असे असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कूमार आगरवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . अनिल कातकाडे , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Hello there! Do you know if they make any plugins to
safeguard against hackers? I’m kinda paranoid about losing everything I’ve worked hard on. Any suggestions?