संपादकीय
Trending

अब्दुलभैय्या शेख यांच्या ईद ए मिलाद कार्यक्रमात सर्व धर्मीय धर्मगुरूंची उपस्थिती

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा                        दिनांक-14/04/2025


सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे राष्ट्रवादी चे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वा आयोजित केलेल्या ईद ए मिलाद कार्यक्रमात सामाजिक सलोखा कायम ठेवत सर्व धर्मीय धर्मगुरूंची उपस्थिती होती .

ईद हा सण आनंदाचा व एकोप्याचा आणि माणुसकीचा संदेश देणार आहे. या कार्यक्रमाला आलेल्या सर्व धर्म गुरूंचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून अब्दुलभैय्या शेख यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करतांना धर्म गुरूंनी अब्दुल या शब्दाचा खरा अर्थ सांगितला अब्दुल चा खरा अर्थ अल्ला का नेक बंदा असा आहे या  कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, प्रेम, विविध धार्मिक सलोखा निर्माण करण्याचे काम अब्दुल भैय्या शेख यांनी केला. यावेळी 700 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली.यावेळी परिसरातील सर्व पञकार,व शिक्षक बांधवांचा सत्कार अब्दुल भैय्या प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आला या वेळी माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब, हिम्मतसींग देशमुख, संतोष औताडे -पञकार, पञकार , मौलाना सद्दाम पटेल, मौलाना शमशाद, मौलाना इम्रान, तालुकाध्यक्ष
अशोकराव मोरे, सरपंच लताताई अभंग,
पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष संतोषजी
पवार, अनिलराव माकोने, विलासराव
देशमुख, अमोलभाऊ अभंग, अशोकशेठ
चौधरी, वसंतराव कांगुणे, संदीप लष्करे,
राजूभाऊ बागडे, अनिल गर्जे, नजीम
सय्यद, शकुर सर, समीर सर, इस्माईल सर,
जावेद शेख, आदी उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी भैय्या सामाजिक
प्रतिष्ठानचे इम्तियाज शेख, अभिराज
आरगडे, स्वप्नील कचरे, अशपाक इनामदार,
सूरज पवार, रेहान शेख प्रतीक बडे, प्रज्वल
साबळे   तसेच परिसरातील नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शकुर शेख यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार अब्दुल भैय्या शेख यांनी मांडले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे