(संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा ) दिनांक 09/03/2023
जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित साधून दिनांक 8 मार्च 2023 रोजी जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय भेंडा येथे महिलांसाठी डॉक्टर शुभांगी तांदळे -पाळवदे यांचे आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात महिलांच्या आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. महिलांनी कमकुवत न राहता आपले कार्य व कर्तृत्व सिद्ध करून दाखवले पाहिजे. जेव्हा एक महिला शिकते तेव्हा तीचा संपूर्ण कुटुंबास फायदा होतो आज पुरुषाप्रमाणे महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत या व्याख्याना मध्ये महिला सक्षमीकरण, महिलांच्या आरोग्य, त्याचबरोबर सोशल मीडियात महिलांचा वाढता वापर व त्याचे दुष्परिणाम, बाल लैंगिक शोषण, अल्पवयीन मुलांची लग्न, स्री भ्रुण हत्या या विषयावर डॉक्टर पाळवदे मॅडम यांनी सविस्तर माहिती सांगितली.या महिला दिन प्रसंगी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी स्वराली तनपुरे ,सारिका बोरूडे, यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन इंग्रजी विभागाकडून भरविण्यात आले होते .दुस-या सञामधे नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.शिवाजी डोईफोडे साहेब यांचे ही महिलांची सुरक्षा व कायदे विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कॉलेज मधील मुलींना ञास देणा-याची गय केली जाणार नाही.काही अडचण असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे साहेब यांनी केले.महाविध्यालयीन मुलीच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या महिला दिन प्रसंगी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्राचार्य सासवडे सर, डॉ. प्राध्यापक मेहेर सर, प्राध्यापक साठे मॅडम , प्रा.डॉ संभाजी तनपुरे,पत्रकार संतोष औताडे, प्रा.दरवडे सर, प्राध्यापक वाकचौरे सर,प्रा.ढोकणे मॅडम,प्रा.काळे सर, प्रा.शेख सर ,रघु मोरकर, तसेच महाविद्यालयीन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.