
संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा. दिनांक – 30/04/2025
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील श्री. ञिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ धाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेवासा या शिक्षण संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024-2025 मधे इयत्ता 8 मधील विद्यार्थी कु.तेजस बापुसाहेब औताडे हा पाञ झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) चे 6 विद्यार्थी व 8 वी चे 11 विद्यार्थी पाञ झाले आहेत. दोन्ही मिळून 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.गुणगौरव करण्यात आला.
हे यश म्हणजे केवळ गुणांचे
प्रमाणपत्र नाही तर विद्यार्थ्यांच्या
उज्वल भविष्यासाठी उघडलेले
सुवर्णडर आहे. कठोर परिश्रम,
मेहनत, जिद्द, चिकाटी, योग्य
मार्गदर्शन व आत्मविश्वास
यांच्या संगतीने मिळालेले यश
विद्यार्थ्यांना आपल्या स्वतः च्या
स्वकर्तुत्वावर पालकांचे नाव
मोठे करण्याची उमेद निर्माण
करते असे प्रतिपादन संस्थेचे
संस्थापक साहेबराव घाडगे
पाटील यांनी केले. व शिष्यवृत्ती
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व
विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री साहेबराव धाडगे पाटील यांनी अभिनंदन केले आहे., बापुसाहेब औताडे सर तसेच इतर शिक्षकांनी विशेष परीश्रम घेवून यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.