स्वतःतील गुणांचा अधिक विकास करीत जीवन यशस्वी करावे – मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील
संतोष औताडे-मुख्य संपादक ,नेवासा. दिनांक – 01/02 /2025
स्वतःतील गुणांचा अधिक विकास करीत जीवन यशस्वी करावे – मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील*
” सविस्तर माहिती- आयुष्यातील प्रत्येक क्षण मनापासून जगावा. स्वतःतील गुणांचा अधिक विकास करीत आयुष्य यशस्वी करावे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करून जीवनाची स्पर्धा विद्यार्थ्यांनी जिंकावी. त्यासाठी आवश्यक असे अद्ययावत आणि कौशल्यपूर्ण शिक्षण महाविद्यालयातून मिळाले पाहिजे.” असे प्रतिपादन मा. आ. डॉ.नरेंद्रजी घुले पाटील यांनी केले. ते जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय आयोजित सहविचार सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांनी जिजामाता महाविद्यालयातील सर्व विभागांना सदिच्छा भेट दिली. कामकाजाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी व्यासपीठावर मा आ पांडुरंग अभंग साहेब ॲड. देसाई आबा देशमुख, काकासाहेब शिंदे, काशिनाथआण्णा नवले, अशोकदादा मिसाळ, शिवाजी पाटील कोलते, डॉ नारायण म्हस्के, रवींद्र मोटे, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल, डॉ.संभाजी काळे, शाखा प्रमुख डॉ.काकासाहेब लांडे, केशव चेके, प्राचार्य डॉ कोलते, प्रा विजय काशीद, बंडू घोडेचोर, उपस्थित होते.