महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासा तालुका महिला अध्यक्ष पदी सौ.मीरा गुंजाळ यांची नियुक्ती.
संतोष औताडे / मुख्य संपादक दि.25/02/2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासा तालुका महिला अध्यक्ष पदी सौ.मीरा गुंजाळ यांची नियुक्ती. सविस्तर माहिती- दि.25/02/2022 रोजी मनसेच्या नेवासा तालुका महिला अध्यक्ष पदी सौ मीरा राजेंद्र गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहेत.सौ मीरा गुंजाळ यांनी देखील आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नेवासा येथे त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी मा. जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, मा. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे , तालुका अध्यक्ष दिगंबर पवार, सहकार सेनेचे तालुका संघटक किरण शिंदे व नेवासा शहर अध्यक्ष शेंडगे आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ.मीरा गुंजाळ यांची मनसेच्या नेवासा तालुका महिला अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.