गुन्हेगारी
Trending

पोलीस उपअधीक्षक, संतोष खाडे यांच्या पथकांने नेवासा शहरामध्ये मावा व सुंगधीत तंबाखु विक्री करणा-या १२ वेगवेगळया ठिकाणी टाकले छापे.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा.                    दिनांक 14/04/2025.


सविस्तर माहिती- पोलीस उपअधीक्षक, श्री. संतोष खाडे यांच्या पोलीस पथकांने नेवासा
शहरामध्ये मावा व सुंगधीत तंबाखु विक्री करणा-या १२ वेगवेगळया ठिकाणी छापा
टाकुन आरोपीताकडुन २,७४,०५० /- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त
आज दिनांक. १३/०४/२०२५ रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे, प्रभारी अधिकारी
नेवासा पोलीस ठाणे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल .

अशा खादयपदार्थ सुंगधीत तंबाखु विक्री करणा-या इसमांची माहिती घेत असताना त्यांना त्यांचे गुप्त

बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नेवासा शहरामध्ये १) परवेज इसाक शेख रा जुनी कोर्ट गल्ली,
नेवासा खुर्द २) वसीम मोहम्मद शेख रा नाईकवाडी गल्ली नेवासा खुर्द, ३) सुलेमान इसाक मनियार रा
जुनी कोर्ट गल्ली नेवासा खुर्द ४) अब्दुला अल्ताफ सय्यद रा इस्लामपुरा गल्ली, नेवासा खुर्द ५)
यासीन बाबा शेख रा जुनी कोर्ट गल्ली नेवासा खुर्द ६) सय्यद अजीम सलीम रा जुनी बाजारपेठ
नेवासा खुर्द ७) जावेद फज्जु शेख रा जुनी कोर्ट गल्ली, नेवासा खुर्द ८) अफरोश युसुफ शहा
रा. लक्ष्मीनगर, नेवासा खुर्द हे इसम त्यांचे दुकानात व घरी सुंगधीत तंबाखु पासुन मावा तयार करुन तो
नेवासा शहरामध्ये विक्री करत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच परि. पोलीस अधीक्षक
श्री. संतोष खाडे यांनी पोलीस स्टाफ व होमगार्ड यांना तात्काळ त्यांचे कॅबिनमध्ये बोलावुन थोडक्यात
बातमीचा आशय समाजावुन सांगुन छापा घालणे बाबत कळवुन पोलीस स्टाफ व होमगार्ड यांचे
वेगवेगळे १२ पथके तयार करुन त्यांना खाजगी वाहनाने वरील इसमांचे दुकानात व घरी रवांना
केले.

सदर पथकांने नमुद इसमांच्या दुकानात व घरी छापा टाकला असता त्यादरम्यान त्यांचे दुकानात व

घरी खालील प्रमाणे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असे
खादयपदार्थ, सुंगधीत तंबाखु, मावा तयार करण्याचे मशीन असा एकुण २,७४,०५०/- रुपये किंमतीचा
मुददेमाल मिळुन आलेला आहे. सदर मुददेमालांचा जप्ती पंचनामा करुन मिळुन आलेल्या इसम नामे १)
परवेज इसाक शेख रा जुनी कोर्ट गल्ली, नेवासा खुर्द २) वसीम मोहम्मद शेख रा नाईकवाडी गल्ली
नेवासा खुर्द, ३) सुलेमान इसाक मनियार रा जुनी कोर्ट गल्ली नेवासा खुर्द ४) अब्दुला अल्ताफ सय्यद
до
रा इस्लामपुरा गल्ली, नेवासा खुर्द ५) यासीन बाबा शेख रा जुनी कोर्ट गल्ली नेवासा खुर्द ६) सय्यद
अजीम सलीम रा जुनी बाजारपेठ नेवासा खुर्द ७) जावेद फज्जु शेख रा जुनी कोर्ट गल्ली, नेवासा खुर्द
८) अफरोश युसुफ शहा रा. लक्ष्मीनगर, नेवासा खुर्द यांचे विरुध्द पो हवा अजय साठे यांचे फिर्यादीवरुन
पोलीस ठाणे नेवासा येथे भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा
आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६, २६ (२), २७ (३) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया
चालु आहे.
यापुढेही बेकायदेशीर अवैध व्यवसाय करणारे व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेली
तंबाखु,गुटखा,मावा यांचे विक्री करणा-या विरुध्द अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात
येणार
असुन अवैध धंदयाबाबत माहिती देणा-यांचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक, श्री राकेश ओला सो, अप्पर पोलीस अधीक्षक, वैभव
कलुबर्मे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री सुनिल पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा
पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी अधिकारी श्री. संतोष खाडे, परि पोलीस उपअधीक्षक, सपोनि अमोल पवार,पवार, पोसई संदिप ढाकणे, पोसई विजय भोंबे, पोसई विकास पाटील, परि. मपोसई श्रध्दा वैदय,
सहा. फौज गणेश नागरगोजे, पो हवा अजय साठे, पो हवा संतोष राठोड, पो हवा शहाजी आंधळे,
पो. हवा सुधाकर दराडे, म पो हवा संगिता पालवे. पो ना किरण पवार, पो ना संजय माने, पोकॉ
श्रीनाथ गवळी, पोकॉ अवि वैदय, पोकॉ सुमित करंजकर, पोकॉ भारत बोडखे, पोकॉ नारायण डमाळे,
पोकॉ आप्पा तांबे, पोकॉ आप्पा वैदय, पोकॉ गणेश फाटक, पोकॉ संदिप ढाकणे, पोकॉ दिलीप घोळवे,
मपोकॉ भारती पवार, मपोकॉ वर्षा कांबळे, मपोकॉ वर्षा गरड, मपोकॉ गिता पवार व होमगार्ड यांचे
पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे