गुन्हेगारी
Trending

जामखेड येथील आडत व्यापा-यास हत्याराचा धाक दाखवून रस्त्यात आडवून लुटमार करणारी टोळी रोख रक्कम 7,10,000/- (सात लाख दहा हजार रुपये) सह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांची कारवाई

संतोष औताडे -मुख्य संपादक) पीआरओ/प्रेसनोट/48/2023 .    दिनांक :-14/03/2023

————————————————–
प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, यातील फिर्यादी दत्तात्रय कुंडलीक बिरंगळ वय 47 धंदा शेती व आडत रा. सोनेगांव ता. जामखेड, जि. अहमदनगर यांचा गावातील व परीसरातील शेतक-यांकडून भुसार मालाची खरेदी करुन त्याची बार्शी जि. सोलापूर येथे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. दि. 15/02/2023 रोजी सायंकाळी 7.00 वा. चे सुमा. फिर्यादी व दुकानाचा हमाल गणेश कांबळे रा. सोनेगांव असे दोघे बार्शी जि. सोलापूर येथून भुसार मालाची विक्री करुन 10 लाख रुपये त्यांचे स्वत:चे मोटार सायकलवरुन घेऊन गावी येत असतांना लोहकरे वस्ती धनेगांव शिवार ता. जामखेड येथे दोन अनोळखी इसम त्यांचेकडील विना नंबरची प्लॅटिना मोटार सायकल हिचेवरुन अंगावर बुरखे घालून येऊन फिर्यादीस पाठीमागून बांबुच्या दांडक्याने मारहाण करुन व मोटार सायकल चालक गणेश कांबळे यास रोडचे दुसरे बाजूस ढकलून देऊन दोघांनी फिर्यादीस दांडक्याने मारहाण करुन हातामधील पिशवी ओढली परंतु ती न निघाल्याने त्यांचे हातातील लोखंडी कोयत्याचे उलटे बाजूने फिर्यादीचे डोक्यात मारुन जखमी करुन 10 लाख रुपये बळजबरीने चोरुन नेलेवरुन खर्डा पो.स्टे. ता. जामखेड गुरनं 44/2023 भादविक. 394,34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके, , स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदरचा चोरीस गेलेला पैसा हा कष्टकरी शेतक-यांचा असल्याने त्यातील आरोपींना लवकरात लवकर गजाआड करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके, पोसई/सोपान गोरे, पोसई. मनोहर शेजवळ, पोहेकॉ. सुनिल चव्हाण, बापू फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप पवार, संदीप घोडके, पोना. शंकर चौधरी, भिमराज खर्से, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप शिंदे, पोकॉ. विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ. उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, चा.पोना. भरत बुधवंत यांचे पथक तयार करुन कारवाई करणेकामी रवाना केले.
पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना माहिती मिळाली की, नमुद गुन्हयात फिर्यादी यांचेकडे काम करणारा हमाल गणेश कांबळे हा सामिल असून त्यानेच त्याचे दोन साथीदारांना फिर्यादी व तो स्वत: रोख रक्कम घेऊन येत असल्याची माहिती दिल्याने त्याचे साथीदारांनी अंगावर बुरखा घालून फिर्यादीस आडवून मारहाण करुन नमुद रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेलेली आहे. तेच तिन इसम एका काळया रंगाचे बजाज प्लॅटिना मोटार सायकल क्रमांक एम.एच. 16 सी.एक्स 4608 हि वरुन वरील नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली रक्कम विल्हेवाट लावण्याकरीता घेऊन जात आहेत. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती गुन्हयाचा समांतर तपास करीत असलेले पथकाचे प्रमुख पोसई सोपान गोरे यांना देऊन खात्री करुन कारवाई करणेबाबत कळविल्याने तपास पथकाने खर्डा इंग्लिश स्कूल, खर्डा समोरील रोडवर वेषांतर करुन सापळा लावून थांबले असता त्यांना भूमकडुन येणारे रोडने बातमीतील नमूद नंबरची मोटर सायकलवरुन तिन इसम येताना दिसले. त्यांची खात्री होताच त्यांनी मोटार सायकल आडवण्याचा प्रयत्न केला असता ते पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांनाच पथकाने त्यांना पाठलाग करुन जागीच पकडून त्यांना त्यांचे नांव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नांवे (1) तुषार उर्फ सोन्या दिपक आल्हाट वय 19 रा. सोनेगांव ता. जामखेड (2) पृथ्वीराज उर्फ बबलु बाळासाहेब चव्हाण वय 20 रा. सदर (3) गणेश सुभाष कांबळे वय 19 रा. सदर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन व परिस्थीतीजन्य पुराव्याची जाणीव करुन दिली असता त्यांनी वरील नमुद गुन्हयाची कबूली देवून त्यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेले रकमेपैकी 7,10,000/- रु. (सात लाख दहा हजार रुपये) रोख रक्कम व त्यांनी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करुन त्यांना पुढील कारवाईसाठी खर्डा पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
सदरची कारवाई मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील साो. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. आण्णासाहेब जाधव, साो., उप विभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग, कर्जत यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे