भेंडा येथील जिजामाता विद्यालयात दहावी व बारावी च्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात संपन्न

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा. दिनांक -02/03/2025.
भेंडा येथील जिजामाता विद्यालयात दहावी व बारावी च्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात संपन्न सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नुकत्याच झालेल्या दहावी व बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात संपन्न झाल्या असल्याचे जिजामाता विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे सर यांनी सांगितले. चालू शैक्षणिक वर्षापासून कॉपी मुक्त परिक्षा घेण्यासाठी महविद्यालया ने आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या होत्या. दहावी बारावी परीक्षेत
गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष लक्ष दिले गेले.सर्व परीक्षार्थीनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत. सकाळ सत्रात स. १०:३० आणि दुपार सत्रात दु. २:३० वाजता परीक्षार्थीनी परीक्षा दालनात उपस्थित राहणं आवश्यक आहे. यावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून वेब
कास्टिंग ,मॉनिटरिंग, ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ शूटिंग,
पोलिस गस्ती पथक व बैठे शिक्षकांचे पथक आदी यंत्रणा कार्यान्वित
असल्याचे सांगण्यात आले.इयत्ता बारावी व दहावीची परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व
निकोप वातावरणात सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कृती
आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्र्यांच्या
मार्गदर्शनाखाली बारावी व दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त,
भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार
पडाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ, महाविद्यालय प्रयत्नशील
आहे.
कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास
गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष
गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा
दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या
परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.
दरम्यान, महविद्यालयात कुठेही
गैरप्रकार झालेला नाही.चालू शैक्षणिक वर्षापासून कॉपी मुक्त परिक्षा घेण्यासाठी महविद्यालयात आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या होत्या.
दरम्यान. यापुढच्या काळात सर्व
परिक्षांच्यावेळी सुद्धा महविद्यालयात कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार
आहे, अशी माहिती प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे सर यांनी सांगितले.