विठ्ठल अर्बन को- आॅप क्रेडिट सो. लि संस्थेच्या चेअरमन पदी श्री कृष्णा गव्हाणे तर व्हा चेअरमन पदी संतोष औताडे-पञकार) यांची बिनविरोध निवड.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा. दिनांक 16/04/2025.
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील श्री विठ्ठल अर्बन को- आॅप क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेच्या चेअरमन पदी संस्थापक श्री कृष्णा गव्हाणे यांची तर व्हा. चेअरमन पदी संतोष औताडे-पञकार) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी सर्व संचालक मंडळ यांनी सहकार्य केले.. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 11 वाजता नवीन पदाधिकारी निवडीसाठी सहकार तथा निवडणूक निर्णय अधिकारी वाय .एल.नरसिंगपुरकर साहेब , प्राधिकृत अध्यासी अधिकारी तथा मुख्य लिपिक अधिन सहायक निबंधक सहकारी संस्था नेवासा

यावेळी संस्थेचे संचालक सौ.सुनिता गव्हाणे, गव्हाणे विजय, कृष्णा गव्हाणे, संदिप जावळे,संतोष औताडे, हौशिरम नवले ,कोलते बाळासाहेब, सौ. आशा जावळे, सौ. उषा गव्हाणे, संजु गव्हाणे ,वायकर किशोर तसेच संस्थेचे मॅनेजर सुरेश दरवडे , क्लार्क कृष्णा मंडलिक, कॅशियर शुभम आढागळे इ. उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी वाय एल नरसिंगपुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.