गुन्हेगारी
Trending

सुगंधीत चंदनाची इनोव्हा गाडीतून वाहतूक करणारे 2 चंदनतस्कार कोतवाली पोलीसांकडून जेरबंद. १८लाख.९६ हजार८९० /रू – किंमतीचा मुद्देमाल जप्त

संतोष औताडे / मुख्य संपादक               दि. 24/02/2022.   


  सुगंधीत चंदनाची इनोव्हा गाडीतून वाहतूक करणारे 2 चंदनतस्कार कोतवाली पोलीसांकडून जेरबंद. १८. लाख ९६.हजार ८९० /रू – किंमतीचा मुद्देमाल जप्त. सविस्तर माहिती- दिसुगंधीत चंदनाची इनोव्हा गाडीतून वाहतूक करणारे 2 चंदनतस्कार कोतवाली पोलीसांकडून जेरबंद. १८.९ ६.८ ९ ० /रू – किंमतीचा मुद्देमाल जप्त . २४/०२/२०२२ रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री.संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , चंदनाचे सुगंधीत वृक्ष तोडण्यास बंदी असताना देखील दोन इसम चंदनाचे वृक्ष बेकायदेशीर तोडुन चोरुन आणलेले सुगंधीत चंदनाचे लाकडाचे तुकडे हे त्यांचे कडील इनोव्हा गाडीमध्ये भरुन वाहतुक करुन विक्री करणे कामी नगर शहरातील उड्डान पुलाचे काम चालू असल्याने ते नगर शहरातून जाणार आहेत व आत्ता जावुन सापळा लावल्यास ते मिळुन येतील अशी बातमी मिळाल्याने पोनि . श्री . संपतराव शिंदे सो यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना सदर ठिकाणी सापळा लावून कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सदर पथकाने चांदणी चौक ते जुने कलेक्टर ऑफीस कडे जाणारे रोडवर सैनिक लॉन गेट समोरच्या परीसरात दि २४/०२/२०२२ रोजी पहाटे ०१/०० वा पासुन सापळा लावला असता चांदणी चौकाकडुन त्यांच्या दिशेने पहाटे ०३/३० वा चे सुमारास बातमीतील वर्णनाची एक राखाडी रंगाची इनोव्हा गाडी येताना दिसली असता सदर पदकाने गाडीचे चालकास थांबण्याचा इशारा दिला असता त्याने त्याचे ताब्यातील इनोव्हा गाडी ही रोडच्या कडेला बेरीकेट च्या जवळ थांबवली असता तीचा क्रं हा MH १२ JU ५६४४ असा असलेला दिसला त्या नंतर सदर गाडीतील इसमास खाली उतरण्यास सांगीतले असता त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव १ ) सुभाष भिमराज दिलवाले वय ४७ वर्ष व गाडीचा चालक २ ) राजेंद्र रंगनाथ सासवडे वय ३० वर्ष दोघे रा चिचोंडी पाटील ता नगर जि अहमदनगर असे सांगीतले पंचासमक्ष त्याचे कडील इनोव्हा गाडीची व त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे खालील वर्णनाचा मुद्देमाल हा मिळून आल्याने तो पुढील प्रमाणे १ ) ७,००,००० / – रु किं ची एक राखाडी रंगाची इनोव्हा गाडी क्रं MH १२ JU ५६४४ असा असलेला जु.वा.किं २ ) ११,८४,००० / – रु किंमतीचे काळे , पिवळे , पांढरे रंगाचे प्लास्टीकच्या १७ गोणी मध्ये भरलेले सुगंधीत वृक्ष चोरुन बेकायदेशीर तोडुन चंदनाचे लाकडाचे तुकडे त्याचे वजन अंदाजे ३७० किलो व त्याचा भाव अंदाजे ३२०० रुपये प्रती किलो प्रमाणे अंदाजे ) १०,००० / – रुकिंचा एक निळे रंगाचा बीवो कंपनीचा मोबाईल फोन त्याचा IMEI ८६०३ ९ ८०४४०११६ ९ ७ व एक काळे रंगाचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन जुवाकिअं ४ ) २८ ९ ० / – रु रोख रक्कम सुभाष भिमराज दिलवाले याचे अंगझडतीत मिळाली त्यात विविध दराच्या चलनी नोटा . एकुण १८ , ९ ६,८ ९ ० / – ( अठरा लाख शहाण्णव हजार आठशे नव्व्द रुपये ) वरील प्रमाणे मुद्देमालासह आरोपी मिळुन आल्याने त्याना ताब्यात घेवून आरोपींना अटक करण्यात आली आहे व त्याचे विरोधात पोना / योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रं १४१ / २०२२ भा.द.वि.कलम ३७ ९ , ३४ , सह भारतीय वन अधिनीयम १ ९ २७ चे कलम ४ ९ , ४२,६६,६६ ( अ ) व महाराष्ट्र नियमावली २०१४ नियम ८२ व महाराष्ट्र अधिनीयम कलम २ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पुढील तपास हा पोना / गणेश धोत्रे हे करीत आहेत पोलीस सदरची कारवाई ही मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो , मा . अपर पोलीस अधिक्षक श्री . सौरभ अग्रवाल सो , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . अनिल कातकाडे सो , यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे , गुन्हे शोध पथकाचे पोना / योगेश भिंगारदिवे , पोना / गणेश धोत्रे , पोना / नितीन शिंदे , पोना / सलिम शेख , पोना / संतोष गोमसाळे , पोना / सागर पालवे , पोना / राजु शेख , पोकॉ / अभय कदम , पोकों / दिपक रोहकले , पोकॉ / अमोल गाढे , पोकॉ / सोमनाथ राउत , पोकॉ / अतुल काजळे तसेच चापोहेकों / बाबासाहेव तागड , पोकॉ / प्रशांत बोरुडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे