ब्रेकिंग
Trending

ऑपरेशन मुस्कान विशेष शोध मोहीम (मिसींग) २०२२ दरम्यान अहमदनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

संतोष औताडे / मुख्य संपादक                      दि.22/02/2022.                                                                सविस्तर माहिती-  अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने  दि . १५/०१/२०२२ ते दि . १५/०२/२०२२ दरम्यान विशेष शोध मोहिम संपुर्ण महाराष्ट्रभर राबवणे बाबत तसेच महिला व बालके यांचा शोध घेण्याचे आदेश झाले होते . त्याअनुषंगाने संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरविलेल्या महिला / पुरुष , बालके तसेच अपनयन व अपहरण केलेल बालके यांचे शोधकामी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे .  दि.०१/१२/२०२० ते.     दि . ३१/१२/२०२० दि .०१ / ०६ / २०२१ ते दि . ३१/०६/२०२१  दि . १५/०१/२०२२ ते दि . १५/०२/२०२२  या कालावधीत ऑपरेशन मुस्कान विशेष शोध मोहीम २०२२ दरम्यान अहमदनगर रेकॉर्डवरील १७७ लहान मुलांचे अपहरणाचे गुन्हे दाखल असुन त्यापैकी गुन्ह्यातील ४ मुले , ४५ मुली असे एकुण ४ ९ व मिसिंगमधील १८४ पुरूष , २४४ स्त्रिया असे एकूण ४२८ मिसिंग व्यक्तींचा यशस्वीरित्या शोध घेण्यात आला आहे . असे एकुण ४७७ हरवलेल्या ९ ६७ महिलांपैकी २४४ महिला व ८३३ पुरुषांपैकी १८४ पुरुष यांचा शोध घेण्यात आला आहे . तसेच पालकांसोबत गेलेले एकुण पेंडीग मुले / मुली १८ ९ पैकी एकुण २० त्यापैकी १४ मुली व ६ मुले यांचा शोध घेण्यात येवून त्यांना नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे . तसेच नगर शहर व अहमदनगर जिल्ह्यात शोध घेण्यात आला असुन कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना नातेवाईकांचे ताब्यात दिले आहेत … आजपावेतो ऑपरेशन मुस्कान दरम्यान करण्यात आलेली कार्यवाही -ऑपरेशन मुस्कान विशेष शोध मोहीम दरम्यान अपहरणाचे गुन्ह्यातील २० मुले , १६७ मुली एकुण १८७ व मिसिंगमधील ९ ४३ पुरूष , ९ ३३ स्त्रिया असे एकूण १८७६ मिसिंग व्यक्तींचा यशस्वीरित्या शोध घेण्यात आलेला आहे . सदरची यशस्वी कामगिरी मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब , मा . श्री सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर , मा . कमलाकर जाधव ,पोलीस उप अधिक्षक , आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली ए.एच.टी.यु.चे पोलीस निरिक्षक भिमराव नंदूरकर , पोसई भैय्यासाहेब देशमुख , पोहेकाँ / ३७३ सोमनाथ कांबळे , मपोहेकाँ / १२४६ अर्चना काळे , मपोहेकॉ / १०८२ अनिता पवार , मपोकाँ / १३६५ छाया रांधवन , मपोकाँ / १७४२ रुपाली लोहाळे चापोकॉ / २६७३ एस.एस. काळे यांनी केली आहे . 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे