आरोग्य व शिक्षण
Trending

पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे-जलमित्र सुखदेव फुलारी

संतोष औताडे-मुख्य संपादक ,नेवासा.                        दिनांक 01/02/2025


जिजामाता महाविद्यालयाचे रासेयो स्वयंसेवकांचा प्लॅटिक कचरा निर्मूलनाचे दिशेने एक पाऊल...

सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर टाळून प्रत्येक मागरिकाने प्लास्टिक कचऱ्याचे घरच्या घरीच तंतोतंत आणि कार्यक्षम व्यवस्थापन केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल असे प्रतिपादन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात दि.१८ जानेवारी रोजी “शून्य कचरा व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन करताना जलमित्र सुखदेव फुलारी यांनी आपल्या घरातील प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन घरच्या घरीच करणे बाबदची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील प्लास्टिक कचरा जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी त्यांच्या घरातील आठवड्याभराचा प्लास्टिक कचरा जमा करून प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटलीमध्ये बंद करून महाविद्यालयात आणून जलमित्र सुखदेव फुलारी यांचे कडे सुपूर्द केला. सदर सर्व प्लास्टिक कचरा प्लास्टिक जमा करणाऱ्या कामगारांच्या स्वाधीन करण्यात आला.

यावेळी बोलतांना कु.तृप्ती मिसाळ म्हणाली की, जिजामाता महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात जलमित्र सुखदेव फुलारी यांनी

शून्य कचरा व्यवस्थापन” या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही सर्वांनी आपापल्या घरातील आठवडाभरतील प्लॅस्टिक कचरा एका रिकाम्या बाटली मध्ये जमा केला आहे. या प्रकारे सर्व नागरिकांनी असा प्रयत्न केला तर प्लॅस्टिक कचरा निर्मूलनाला हात भार लागून आपले घर,आपले गाव प्लॅस्टिक मुक्त होईल आणि पर्यावरणाची हानी होणार नाही.या सामाजिक उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ही कु.मिसाळ हिने केले.
या कार्यक्रमास श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ.नारायणराव म्हस्के, अशोकराव मिसाळ, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, डॉ.शरद कोलते,उपप्राचार्य डॉ.रमेश नवल, उपप्राचार्य डॉ.संभाजी काळे,पत्रकार संतोष औताडे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभाग समन्वयक प्रा.डॉ. संजय महेर,कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. अब्दुललतिफ शेख,प्रा.डॉ. मोहिनी साठे,डॉ.संभाजी तनपुरे, प्रा.विकास कसबे,प्रा.योगेश लबडे,प्रा.वैभव लाटे, कार्यालयीन अधीकक्षक बंडू घोडेचोर, रमेश भालेकर,रघुनाथ मोहरकर,जनार्दन अरगडे
आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे