
संतोष औताडे (मुख्य संपादक -नेवासा ) दिनांक-22/09/2022
नेवासा फाटा येथील वेश्याव्यवसाय करणा-या तीन हॉटेलवर छापा.सात मुली ताब्यात.
सविस्तर माहिती-अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे तीन ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. Dysp संदीप मिटके यांना नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली होती. त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल पायल,हॉटेल नामगंगा,व हॉटेल तिरंगा या ठिकाणी एकाच वेळी बनावट ग्राहक पाठवुन छापा टाकुन सात पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.
त्यानुसार आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाच वेळी तीन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात एकच धावपळ उडाली होती. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी स्वतःची यंत्रणा वापरुन नेवासा फाटा येथील या अनैतिक व्यवसायाची सविस्तर माहिती काढली होती. मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय नेवासा फाटा परिसरात फोफावलेला असल्याने एकाचवेळी सर्वत्र छापे टाकण्यासाठी एकाच पोलीस ठाण्यातील उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विसंबून चालणार नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, नेवासा पोलीस ठाण्याचे विजय करे, शेवगाव पोलीस ठाण्याचे विलास पुजारी, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चौधरी, आदी सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके बनवत सापळा रचला. या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रचंड दक्षता घेऊन तसेच गुप्तता पाळली होती.
या कारवाईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या सहा परप्रांतीय तर एका महाराष्ट्रीयन महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. नेवासा फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथून तीन मुली, हॉटेल नामगंगा येथून तीन मुली तर हॉटेल पायल मधून एका मुलीला ताब्यात घेण्यात आले. या सर्व पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , राहुरी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे, शेवगाव पोलिस निरीक्षक विलास पुजारी, Api मानिक चौधरीं व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांनी ही कारवाई केली.



