
संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा, दिनांक- 06/05/2025
सविस्तर माहिती- देशभरात होणार उद्या मॉक ड्रिल वाजणार आपत्कालीन सायरन जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.
देशभरातील युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून, गृह मंत्रालयाने उद्या, अर्थात 7 मे रोजी अनेक राज्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शाळा, मॉल, रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मॉक ड्रील म्हणजेच सराव कवायती आयोजित करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. यात कॅटेगिरी एकमध्ये मुंबई, उरण आणि तारापुरचा समावेश आहे. कॅटेगिरी दोनमध्ये ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सिन्नर, मनमाडचा समावेश आहे. संभाजीनगरचा समावेश कॅटेगिरी तीनमध्ये केला आहे.

2. हल्ला झाल्यास नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सतर्क करणे.
3. हवाई हल्ल्यादरम्यान ब्लॅकआउटचा म्हणजे दिवे बंद करण्याचा सराव.
4. शत्रूच्या विमानांपासून संरक्षण करण्यासाठी यंत्र झाकण्याचे आणि लपवण्याचे प्रशिक्षण.
5. हल्ल्याची संभाव्य ठिकाणे रिकामी करण्यासाठी सराव.

सर्वांत प्रथम शांत राहा, घाबरून जाऊ नका.
5 – 10 मिनिटांत सुरक्षित जागेवर पोहोचा.
टीव्ही, रेडिओ आणि सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.
अफवांवर विश्वास ठेवू नका.
प्रशासकीय निर्देशांचे पालन करा.
गर्दीच्या ठिकाणी असलात तरी पळापळ किंवा चेंगराचेंगरी करू नका.
लहान मुले आणि महिलांना सुरक्षित स्थानी पोहोचण्यास मदत करा. या माॅक ड्रिल साठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.