भेंडा येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण संपन्न.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा. दिनांक- 08/04/2025
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील दक्षिणमुखी हनुमान मंदीरात आज दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वा देवगड संस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते भव्य धर्म ध्वजारोहण करण्यात आले. सर्व जाती-धर्मातील जनता सुसंवादाने राहावी याकरिता मंदिरांची निर्मिती केली पाहिजे असे महंत भास्करगिरीजी महाराज यांनी सांगितले.

आणि सर्वांचे सुखाकरिता संतांकडे जायचे आहे. मंदिराच्या माध्यमातून सुसंवाद साधत राहिला पाहिजे. देशात सुसंवादाचा,आपुलकीचा आणि श्रद्धेचा मार्ग दृढ व्हावा यासाठीच मंदिरे आहेत. मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता म्हणजे मंदिर. देश सुजलाम-सुफलाम व्हावा, सर्व जातीधर्मातील जनता सुसंवादाने राहावी आणि सर्वांना आनंद प्राप्त व्हावा याकरिता मंदिरांची निर्मिती असते असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे महंत भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

सोहळ्याच्या निमित्ताने भेंडे बुद्रुक येथील
श्री क्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिर
येथे 8 ते 12 एप्रिल दरम्यान रोज
सायंकाळी 7 ते 9 या वेळेत भव्य कीर्तन
महोत्सवाचे आयोजन करण्यात आले
असल्याची माहिती श्रीराम सेवा
मंडळाच्या वतीने देण्यात आली.
मंगळवारी (9 एप्रिल) लक्ष्मण महाराज
नांगरे, बुधवारी प्रवीण महाराज गोसावी,
गुरुवारी भागवताचार्य म्हातारदेव महाराज
आठरे, तर शुक्रवारी (11 एप्रिल)
रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी
यांचे कीर्तन होणार आहे. शनिवारी 12
एप्रिल सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्री
हनुमानाला पंचामृत महाभिषेक व
जन्मोत्सव सोहळा ज्ञानेश्वर कारखान्याचे
कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांच्या
हस्ते होणार आहे. त्यानंतर महंत बालयोगी
अमोलजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन
संपन्न होऊन महाप्रसाद होईल.
लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कीर्तन महोत्सव गुरुवर्य महंत भास्करगिरी
महाराज, गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर,
महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, महंत
सुनीलगिरी महाराज, वेदांताचार्य देविदास
महाराज म्हस्के, महंत उध्दव महाराज मंडलिक
यांच्यासह सर्व संत-महंतांच्या कृपाशीर्वादाने
संपन्न होत आहे. कीर्तन महोत्सवासह हनुमान
जन्मोत्सव सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन
श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने
करण्यात आले आहे. यावेळी
महंत सुनीलगिरीजी महाराज, आप्पा महाराज हनुमान टाकळी, ऋषिकेश महाराज, रमेशानंदगीरी महाराज, कादे महाराज, मुंगसे महाराज, तुकारामजी मिसाळ , अशोकदादा मिसाळ, काशिनाथ आण्णा नवले, गणेश महाराज चौधरी,आमदार विठ्ठलराव लंघे,बापूसाहेब नजन , तसेच भेंडा व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.