
संतोष औताडे-मुख्य संपादक ,नेवासा दिनांक 19/04/2025
सविस्तर माहिती-अहिल्यानगर पोलिस दलातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा तर्फे मिसींग शोध मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.दिनांक 17/04/2025 ते 15/05/2025 या कालावधीत हि विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.या कालावधीत संपुर्ण महाराष्ट्रात व सर्व जिल्ह्यात
मिसिंग शोध मोहीम राबविण्यात येत असुन सदर कालावधीत रेकॉर्डवरील हरविलेले / पळविलेले
अल्पवयीन मुले/मुली तसेच रेकॉर्ड व्यतिरिक्त रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भीक
मागणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले, धार्मीक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने
इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले तसेच मिसिंग महिला व मिसिंग पुरूष यांचा शोध घेण्यात
येणार आहे. त्या करिता जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस पथक सदर
कालावधीसाठी नेमण्यात आलेले आहे. सदरची मोहिम अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात येत
असुन त्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो., मा. अपर पोलीस अधिक्षक
श्री. प्रशांत खैरे सो., श्री. गणेश उगले उपविभागिय पो. अधिकारी सो. आर्थिक गुन्हे शाखा,
मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अशासकिय संस्था,
यांचे
बालगृह, बालकल्याण समिती, जिल्हा बालसुरक्षा कक्ष यांचे समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
जिल्हा स्तरावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, अहिल्यानगर यांचे पथक नेमण्यात आले
आहे.
सदरची मोहिम मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो., अपर पोलीस अधिक्षक श्री.
प्रशांत खैरे सो., उपविभागिय पो. अधिकारी श्री. उगले सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. राजेंद्र इंगळे,
पो.हे.कॉ. २०२४/एस. ए. सय्यद, मपोहेकॉ १२४६ / ए. आर. काळे, मपोहेकॉ / १०८२ ए. के. पवार,
मपोकॉ / १३६५ सी. टी. रांधवन, चापोकॉ / २६७३ एस एस काळे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध
कक्ष अहिल्यानगर हे राबवित आहे.