पोलीस ठाणे नेवासा हददीत विनापरवाना लाउड स्पिकर (साउड सिस्टीम) डिजे, ड्रोन उडडाण केल्यास कठोर कायदेशीर कारवाई- संतोष खाडे, पोलिस उपअधीक्षक, नेवासा

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक -19/05/2025
पोलीस ठाणे नेवासा हददीत विनापरवाना लाउड स्पिकर (साउड सिस्टीम) डिजे,
ड्रोन उडडाण केल्यास कठोर कायदेशीर कारवाई- संतोष खाडे, पोलिस उपअधीक्षक
सविस्तर माहिती- नेवासा हददीतील सर्व सुजान नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, मा. उच्च
न्यायालयानें क्रिमिनिल रिट पिटीशन नं ४७२९ / २०२१ या संदर्भात बेकायदेशीर रित्या बसवलेल्या लाउड
स्पिकर इत्यादी मुळे होणा-या ध्वनी प्रदुषणाबाबत कायदयाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी
केली आहेत. या ध्वनी प्रदुषणामुळे (डिजे वादयामुळे) अनेक वुध्द व्यक्ती, लहान मुले, आजारी इसम,
विकलांग इसम यांचे आरोग्यास हानी पोहचत आहे. मा. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार डिजे वर बंदी
घालण्यात आली असुन पोस्ट हददीत कोणीही यापुढे डिजे वाजवणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घेतील.
तरी यापुढे पोलीस ठाणे नेवासा हददीत विनापरवाना ध्वनी क्षेपक / लाऊड स्पीकर लावुन
वाजवताना मिळुन आल्यास संबंधीत चालक मालक / आयोजक यांचेवर ध्वनीप्रदुषण अधिनियम २०००
मधील तरतुदीच्या अनुषंगाने प्रचलीत कायदयान्वये योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद
घ्यावी तसेच पोस्ट ह्दीतील मंदिर, मशिद, मदरसा, चर्च, गूरुद्वार व इतर धार्मिक स्थळे यांनी संबंधीत
ठिकाणी परवानगी घेवुन लाऊड स्पिकर चा वापर मर्यादित शासन निर्णयाप्रमाणे करावा.
तसेच सध्या चालु असलेल्या भारत / पाकिस्तान तणावाचे वातारवणामुळे मा. आयुक्त राज्य
गुप्तवार्ता विभाग यांचे कडील SID / IG/CS@S / १४SCM / २०२५ – १९६२ दिनांक १४/०५/२०२५ अन्वये
पोस्टे हददीत कोणीही इसम ड्रोन उडडाण करणार नाही तसेच आढळुन आल्यास संबंधीतावर योग्य ती
कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
ध्वनीक्षेपाचा आवाजा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशना प्रमाणे ५५ डेसिबलपर्यत ठेवावे.
क्षेत्राचा प्रवर्ग
डेसीबल (ए) एलईक्यु मधील मर्यादा
क्षेत्राची झोनची
वर्गवारी
दिवसा
रात्री
अ क क्षेत्र औद्योगिक
75-70 ब)वाणिज्यीत क्षेत्र 60-55 क)निवासी क्षेत्र 55-45 ड)शांतता क्षेत्र 50-40
या प्रमाणात ठेवावे. नियमांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे नेवासा पोलीस स्टेशन चे परिविक्षाधीन पोलिस उप.अधिक्षक संतोष खाडे साहेब यांनी सांगितले आहे.