गुढीपाडव्याच्या रात्री उल्कावर्षाव राज्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
संतोष औताडे / मुख्य संपादक. दि.03 एप्रिल 2022
गुढीपाडव्याच्या रात्री उल्कावर्षाव
राज्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
सविस्तर माहिती– गुुीपाडव्याच्याढ रात्री उल्कावर्षाव झाला
राज्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून तो वेगाने पसरत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमक काय आहे हे समजू शकले नाही. मात्र चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यात उल्कापिंड कोसळल्याचीही चर्चा आहे. या ठिकाणी मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातून पडल्याची चर्चा आहे. खगोल अभ्यासकांनी हा पृथ्वीच्या कक्षेत आलेला उपग्रह असल्याची शंका वर्तवली आहे. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे आकाशातून लाल झोत खाली कोसळत असल्याचे चित्र दिसले आहे
अनेक जिल्ह्यात भितीचे वातावरण
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. उल्कापातचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र नेमके या उल्का कुठे पडल्या या अद्याप समजू शकले नाही. जळगाव शहरासह मुक्ताईनगर चोपडा या भागात अनेकांनी उल्कापात पाहिल्याचा दावा केला आहे. लोकांना सध्या नेमंक होतंय हे काय कळेनाय. याबाबत प्रशासनाचीही अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही.