मोक्का गुन्ह्यात तसेच पाच जिल्ह्यातील २६ गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

संतोष औताडे / मुख्य संपादक दि. 05 एप्रिल 2022
अहमदनगर , बीड व पुणे जिल्ह्यातील मोक्का गुन्ह्यात तसेच सातारा , औरंगाबाद सह पाच जिल्ह्यातील २६ गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद.
सविस्तर माहिती-अहमदनगर , बीड व पुणे जिल्ह्यातील मोक्का गुन्ह्यात तसेच सातारा , औरंगाबाद सह पाच जिल्ह्यातील इतर 23आशा 26 गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दिनांक ११ / ०६ / २०२ ९ रोजी दुपारचे वेळी फिर्यादी श्री . बाबाजी तुकाराम मोरे , वय ६५ वर्षे , रा . कामटवाडी , ता . पारनेर हे घरी असताना अनोळखी पाच इसमांनी चाकू , लाकडी काठ्या हातामध्ये घेवून फिर्यादी यांचे घरामध्ये घुसून फिर्यादीचे गळ्याला चाकु लावून दमदाटी करुन कपाटाची उचकापाचक करुन ३४,५०० / -रु.कि.चे सोने चांदीचे दागिणे दरोडा टाकून चोरुन नेले होते . सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. ४१७/२०२१ भादविक ३ ९ ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून मा . पोलीस अधीक्षक सो , अहमदनगर यांनी पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना सदरचा गुन्हा तात्काळ उघडकिस केले होते तपास करीत असतांना गुन्ह्यातील आरोपी नामे मिलन उर्फ मिलींद ईश्वर भोसले , वय २३ वर्ष , रा . बेलगांव , ता . कर्जत , ह.रा. बनकूठे शिवार , ता . पारनेर यास ताब्यात घेवून तपासा दरम्यान त्याने १,०१,८५० / -रु . किं . • चा मुद्देमाल काढून दिला व सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार नामे संदीप ईश्वर भोसले , मटक ईश्वर भोसले , पल्या ईश्वर भोसले , अटल्या उर्फ अतूल ईश्वर भोसले अशांनी मिळून केल्याची कबुली दिल्याने गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १ ९९९ चे ( मोक्का ) कलम ३ ( १ ) ( IT ) . ३ ( २ ) व ३ ( ४ ) हे वाढीब कलम लावण्यात आले होते • घटना घडल्या पासून वर नमुद आरोपी फरार झाले होते . आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर हे शोध घेत असतांना पोनि / अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि आरोपी नामे संदीप ऊर्फ संदीप्या भोसले हा पावस , जिल्हा रत्नागिरी परिसरामध्ये त्याचे नाव बदलुन राहत आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / श्री . अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथकाची नेमणुक करून मिळालेल्या बातमी प्रमाणे कारवाई करणे बाबत सूचना देवुन पथक रवाना केले . पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे , पोहेकॉ
/ सुनिल चव्हाण , दत्ता हिंगडे , संदीप पवार , पोका / सागर ससाणे व रणजीत जाधव अशांनी मिळून पावस , जिल्हा रत्नागिरी परिसरात आरोपीचा शोध घेत असतांना पथकास आरोपी हा विजय नारायण भोसले रा . बाहिरा , ता . आष्टी , जिल्हा बीड असा नावामध्ये बदल करुन चांदोर , जिल्हा रत्नागिरी येथील लाल रंगाचे दगडाच्या खाणीमध्ये मजुर म्हणुन कामे करीत आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी देशांतर करून खानीवर ट्रक ड्रायव्हर व मजुर म्हणुन कामगारा सोबत तीन दिवस मुक्कामी राहुन काम केले .दरम्यान आरोपीचे राहण्याचे ठिकाणा बाबत माहिती घेवून खात्री करुन आरोपीचे राहते ठिकाणी सापळा लावून पहाटेचे वेळी छापा घालताच पोलीसांची चाहुल लागताच आरोपी हा पळुन जावु लागताच पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचा साधारणतः तीन किलो मिटर पाठलाग करुन ताब्यात घेतले . त्यास पोलीस स्टाफची ओळख सांगून त्यास त्याचे नांव , पत्ता विचारले असता त्याने सुरुवातीस सांगुन तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला . त्यास अधिक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने त्याचे खरे नाव संदीप ऊर्फ संदीप्या ईश्वर भोसले रा . बेलगांव , ता . कर्जत असे सांगुन वरील प्रमाणे पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेला गुन्हा व इतर गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवून पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे . पुढील कार्यवाही पारनेर पोलीस स्टेशन करीत आहेत . आरोपी संदीप ऊर्फ संदीप्या ईश्वर भोसले रा बेलगांव , ता . कर्जत सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद यापूर्वी अहमदनगर पुणे सातारा , बीड व औरंगाबाद दरोडा , जबरी चोरी , घरफोडी , चोरी बेकायदेशिर रित्या हत्यार कब्जात बाळगणे अशा प्रकारचे खालील प्रमाणे एकूण ४४ गुन्हे दाखल आहेत . तसेच अहमदनगर -०१ , बीड- ०१ , व पुणे -०१ अशा तीन जिल्ह्यात ०३ मोक्का गुन्ह्यासह इतर ठिकाणच्या दरोडा . दरोड्याची तयारी , जबरी चोरी , घरफोड्या , पोलीसांच्या रखवालीतुन पळून जाणे अशा २३ गुन्ह्यासह एकुण २६ गुन्ह्यात फरार आहे.सदरची करवाई मा. मनोज पाटील सा- पोलिस अधीक्षक अ.नगर ,मा.सौरभ कुमार अग्रवाल हो.अपर पोलिस अधीक्षक,श्री जित पाटील,सो.उपविभागीय पोलिस अधिकारी, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदार व पोलीस अधिकारी यांनी केली.