भेंडा येथे ॐचैतन्य कानिफनाथ मंडळाकडून खुल्या थ्रीबॉल टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
संतोष औताडे -मुख्य संपादक नेवासा, दिनांक -30/01/2026 सविस्तर माहिती – नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील ॐ चैतन्य कानिफनाथ तरुण मंडळ यांच्या वतीने भव्य खुल्या थ्रीबॉल टेनिस क्रिकेट स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 30 जानेवारी 2026 पासून ते दिनांक 3 फेबुवारी 2026 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन मा. संचालक अशोक दादा मिसाळ, पञकार सुखदेव फुलारी ,पञकार संतोष औताडे, सिध्दांत नवले पाटील, किशोर मिसाळ, उपसरपंच दादा गजरे, उपसरपंच भाऊसाहेब फुलारी ,येडुभाऊ सोनवणे ,वृषीकेश तागड, संतोष साळवे, सुहास वेताळ,यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे प्रथम बक्षीस मा.श्री सिद्धांतदाद नवले पाटील यांच्या वतीने 51,000 रू ,दुसरे बक्षीस भाऊसाहेब फुलारी व सरपंच किशोर मिसाळ यांच्या वतीने 31,000 रु तृतीय बक्षीस श्री पिंटुशेठ वाघडकर यांच्या वतीने 21,000 रु चतुर्थ बक्षीस श्री भाऊसाहेब शेठ गदाई यांच्या वतीने 11,000 रु ठेवण्यात आले आहे.




