महाराष्ट्र
Trending

अहमदनगर जिल्हयातील लोकन्यायालयात दुप्पट प्रकरणे निकाली. ७९ कोटी १६ लाख ६६ हजार ४१८ रुपयांची वसुली

संतोष औताडे / मुख्य संपादक.                   दि. 13/03/2022


अहमदनगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर व अहमदनगर बार असोशिएशन , अहमदनगर व सेंट्रल बार असोशिएशन यांचे संयुक्त विदयमाने शनिवार , दि . १२/०३/२०२२ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय , अहमदनगर तसेच सर्व तालुका न्यायालय येथे करण्यात आले . सदर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन वैकल्पीक वाद निवारण केंद्र , अहमदनगर या नवीन भव्य इमारतीमध्ये करण्यात आले . राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री . राजेंद्र भोसले व महानगर पालिका आयुक्त श्री . शंकर गोरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन पक्षकारांच्या हस्ते करण्यात आले . राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयांतील दिवाणी प्रकरणे , फौजदारी , एन . आय . अॅक्ट प्रकरणे , बँकेची कर्ज वसुली प्रकरणे , मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे , कामगार न्यायालयांतील प्रकरणे , कौटुंबिक वादाची प्रकरणे , विज महावितरणाची समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयांत येण्याअगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे , आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती . अहमदनगर जिल्हयामध्ये ३२ , २४५ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली . तर ३७७ ९ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच ७ कोटी , १६ लाख ६६ हजार ४१८ रुपयांची रकमेची करण्यात आली . अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयांत हे लोकन्यायालय आयाजित करण्यात आले होते .जिल्हा न्यायालय , अहमदनगर येथे हे लोकअदालत अध्यक्ष , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर श्री . सुधाकर वें . यार्लगड्डा , जिल्हा न्यायाधीश १ , श्री . मिलिंद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर बार असोशिएशन अध्यक्ष , अॅड . श्री . अनिल सरोदे , सेंट्रल बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड . श्री . के . एम . देशपांडे , सरकारी वकिल अॅड . श्री . सतिष पाटील व सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , रेवती देशपांडे , मा . श्री . शंकर गोरे , आयुक्त , अहमदनगर महानगर पालिका यांचे उपस्थितीत पार पडली . जिल्हा न्यायालयाचे प्रांगण रांगोळी व फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले होते . पारंपारीक न्यायालयापेक्षा आगळे वेगळे स्वरूप न्यायालयांस देण्यात आले होते . बँका , महानगरपालिका व ग्रामपंचायत यांची दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली . महानगर पालिकेची व ग्रामपंचायत कर वसुली प्रकरणे यामध्ये ठेवण्यात आली होती . त्यासाठी वेगळा मंडप व पक्षकरांच्या सुविधेसाठी अनेक काउंटर ठेवण्यात आले होते . कर वसुली प्रकरणांना नागरीकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला . सदरचे लोकन्यायालय न्यायाधिश , वकिल , पोलिस , विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वी रितीने पार पडले . ठेवलेल्या प्रकरणांची संख्या तडजोडीने मिटलेल्या प्रकरणांची वसुल झालेली रक्कम रुपये  ७ ९ , १६ , ६६ , ४१८ इतकी आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे