महाराष्ट्र
Trending

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉ राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी, मनोज पाटील पोलिस अधीक्षक यांना पुरस्कार प्रदान

 

संतोष औताडे / मुख्य संपादक.             दिनांक. 22 एप्रिल 2022.


   राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी, मनोज पाटील पोलिस अधीक्षक यांना पुरस्कार प्रदान


सविस्तर माहिती-  नगरी सेवा दिनाच्या निमित्ताने 21एप्रिल 2022 रोजी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत विविध पुरस्कार देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील 18 पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले . सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख , खासदार अरविंद सावंत , मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव , सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ . संजय चहांदे , राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी , शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते . कोविड काळात स्वत : चा जीव धोक्यात घालून , कुटूंबापासून दूर राहून शासकीय यंत्रणेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळे आपण आज सुखरूप आहोत असे उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत प्राप्त पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत , मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावर विजय वाघमारे , सचिव , अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले . राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव या वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार दिपेंन्द्र सिंह कुशवाहा , मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी , मुंबई , पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु . , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक , द्वितीय पुरस्कार राहुल व्दीवेदी यांना देण्यात आला

.विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार मनोज पाटील , पोलीस अधीक्षक, अहमदनगर , पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु . सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक , द्वितीय पुरस्कार अनिरूध्द बक्षी , उपविभागीय अधिकारी , उपविभागीय अधिकारी कार्यालय , यवतमाळ , पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु . , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक , तृतीय पुरस्कार एस . एस . शेवाळे , गटविकास अधिकारी , पंचायत समिती , राहता , अहमदनगर पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु . , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले .मुंबईत नुकताच हा सोहळा पार पडला.शासकीय अधिकारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार डॉ . राजेंद्र बी . भोसले , जिल्हाधिकारी , अहमदनगर , पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक , द्वितीय पुरस्कार अभिजीत राऊत , जिल्हाधिकारी , जळगाव , पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु . सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक , तृतीय पुरस्कार एकनाथ बिजवे , नायब तहसिलदार , उपविभागीय अधिकारी कार्यालय , यवतमाळ , पारितोषिकाचे स्वरुप रोख वीस हजार रु . सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आला . अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ई टपाल प्रणालीविषयी अतिशय उत्तम काम केले आहे.या प्रणालीच्या वापरामुळे पोलीस खात्यांतर्गत टपाल देण्यासाठी होणारा खर्च वाचणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय.

नागरिकांनी दिलेल्या त्यांचं निवेदन एसपी कार्यालयातल्या टपाल विभागात जमा होतं. मात्र त्या टपालाची सद्यस्थिती काय आहे, ते कोणाकडे आहे किंवा त्या टपालाबाबत काय निर्णय झाला, याविषयीची सविस्तर माहिती ई – टपाल सेवेमुळे नागरिकांना मिळणार आहे. या प्रणालीच्या वापरामुळे शासनाचे लाखो रुपये वाचणार आहेत, अशी माहिती एसपी पाटील यांनी पत्रकारांना दिलीय.नाही

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे