गुन्हेगारी
Trending

राहुरी येथील हॉटेलवर पिटा कायद्याअंतर्गत कारवाई.

संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा ,                    दिनांक -22/01/2026


सविस्तर माहितीसाठी – श्रीरामपुर दि. २१/०१/२०२६ रोजी
राहुरी येथील नंदादिप लॉजिंग, चिंचोली, राहुरी येथील कुंटणखान्यावर पिटा कायदयांतर्गत गुन्हा दाखल, १ महिलेची
सुटका करुन १ आरोपीस अटक अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयाची कारवाई
.
दिनांक २०/०१/२०२६ रोजी सकाळी श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांना
मिळालेल्या गोपनिय माहिती प्रमाणे राहुरी पोलीस स्टेशन हददीत चिंचोली गावचे शिवारात नंदादिप लॉजिंग येथे
अज्ञात इसम स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता मुलींना पैशाचे अमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करुन सदर हॉटेल
लॉजिंगवर जागा उपलब्ध करुन त्यांचेकडुन कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित आहे. अशी खात्रीशीर माहिती
मिळाल्याने अपर पोलीस अधीक्षक, कार्यालयातील पोसई चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.ना. संदीप
दरंदले, पो.कॉ. सतिष पठारे, पो. कॉ. सहदेव चव्हाण यांना सुचना देवुन पोलीस निरीक्षक, ठेंगे, राहुरी पोलीस
स्टेशन यांची मदत घेवुन कारवाई करणेबाबत सुचना देवून रवाना केले होते.
अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी राहुरी
पोलीस स्टेशनला येवुन पो. नि. संजय ठेंगे, यांना नमुद गोपनिय माहिती दिली त्यांनी लागलीच कारवाई करीता पंच
व राहुरी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन नंदादिप लॉजिंग, चिंचोली गावचे शिवारात छापा कारवाई
करणेकरीता रवाना झाले.
नमुद पथकाने नंदादिप लॉजिंग, चिंचोली, राहुरी येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता
पो.नि. संजय ठेंगे, यांनी एका खाजगी इसमास बोलावुन घेवुन त्यास गोपनिय बातमीतीबाबत माहिती देवुन बनावट
ग्राहक म्हणुन पाठविले पथकाने नमुद लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय चालु असलेबाबत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष
नमुद लॉजिंगवर छापा टाकला. हॉटेलचे काऊंटरवर असलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे
नाव अमोल रामचरण अहिरवार, वय २९ वर्ष, रा. नंदादिप, चिंचोली ता. राहुरी मुळ रा. खजरी, दमोह, मध्यप्रदेश व
तो हॉटेल मॅनेजर असलेबाबत सांगीतले. त्यास सदर हॉटेलचे मालकाचे नाव विचारले असता त्याने नाव
सांगण्यास नकार दिला. त्यास पथकाची ओळख सांगुन त्यास ताब्यात घेवुन पंचासमक्ष लॉजिंगची पाहणी केली
असता वरील मजल्यावर रुम नं. १०४ मध्ये १ महिला मिळुन आली. नमुद महिलेकडे विचारपुस करता सदर
महिला पच्छिम बंगाल राज्यातील असुन हॉटेलचे मालक व मॅनेजर माझ्याकडुन वेश्या व्यवसाय करुन
ग्राहकांकडुन पैसे घेऊन, त्यामधुन आम्हास काही पैसे देतात व माझ्याकडुन वैश्या व्यवसाय करुन घेतात.
वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर माझी उपजिविका चालत असलेबाबत माहिती दिली. नमुद पथकाने सदर
महिलेची सुटका केलेली आहे.
नंदादिप लॉजिंग, चिंचोली, राहुरी येथे छापा टाकुन केलेल्या कारवाई मध्ये हॉटेल मॅनेजर अमोल
रामचरण अहिरवार, वय २९ वर्ष, रा. नंदादिप, चिंचोली ता. राहुरी मुळ रा. खजरी, दमोह, मध्यप्रदेश व
अनोळखी हॉटेल चालक मालक हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता मिळुन आलेल्या महिला कडुन कुंटणखाना
चालतवांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोकॉ सतिष पठारे, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय
श्रीरामपुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पो.स्टे. गु.र.नं. ५५ / २०२६ स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यावारास
(प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस
निरीक्षक, संजय ठेंगे, राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. सोमनाथ घार्गे साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ
वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे
मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय ठेंगे, सपोनि सुदाम शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील
पोसई/ चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.ना. संदीप दरंदले, पो. कॉ. सतिष पठारे, पो. कॉ. सहदेव
चव्हाण तसेच राहुरी पो.स्टे. चे पोहेकॉ एस. बी. आवारे, मपोकॉ/ वंदना पवार यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे