चांदा ता. नेवासा येथे गावठी कट्टयातुन फायरिंग करुन खुन करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.
क्रमांक: पीआरओ/प्रेसनोट/12/2026
संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा दिनांक-13/01/2026 ———————————————————-
चांदा ता. नेवासा येथे गावठी कट्टयातुन फायरिंग करुन खुन करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.
———————————————————-
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 11/01/2026 रोजी शाहिद राजमहंमद शेख वय 22 वर्षे, रा. चांदा ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हा त्याचे मित्रासह चांदा परिसरामध्ये कंदुरीचे कार्यक्रमासाठी गेला होता. कंदुरीचे कार्यक्रमामध्ये मयत शाहिद राजमहंमद शेख याचे सुरज लतिफ शेख व अक्षय बाळु जाधव यांचेशी वाद होवुन आरोपी यांनी शाहिद शेख याचे छातीमध्ये गावठी कट्टयातुन फायर करुन त्याचा खुन केलेला आहे. सदर खुनाचे घटनेबाबत फिर्यादी श्री यासीन इब्राहिम शेख रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांनी सोनई पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 11/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 3(5) सह आर्म ऍ़क्ट 3/25, 7, 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घटनाठिकाणी भेटी देवुन घटनेचे गांभीर्य पाहुन आरोपींचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखेची 03 पथके तयार करुन सदर पथकास सुचना व मार्गदर्शन करुन सदरची पथके रवाना करण्यात आलेली होती.
सदर पथकांनी घटनाठिकाणी जावुन आरोपींबाबत माहिती घेवुन गोपनिय माहिती व व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती संकलित केली. सदर माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेत असतांना दिनांक 13/01/2025 रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी सुरज शेख हा बाभळेश्वर, ता. राहाता परिसरामध्ये लपुन बसलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ बाभळेश्वर या ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी एक इसम संशयीत रित्या दिसुन आला. सदर इसमाची खात्री करणेकामी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार त्याचेकडे जात असतांना सदरचा आरोपी पथकास पाहुन सदर ठिकाणावरुन पळुन जावु लागला. पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा 1 कि.मी. पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव 1) सुरज लतीफ शेख वय 24 वर्षे, रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार 2) अक्षय बाळु जाधव रा. समतानगर चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (फरार), 3) सुरज कैलास उबाळे रा. शास्त्रीनगर, चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (फरार) अशांनी मिळुन मयत नामे शाहिद राजमहंमद शेख यास आर्थीक व्यवहार व वादाचे कारणावरुन गावठी कट्टयामधुन फायर करुन खुन केल्याची कबुली दिलेली आहे. सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपी व गुन्ह्यात वापरलेल्या गावठी कट्टयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन शोध चालु आहे.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री किरणकुमार कबाडी, सपोनि/हरिष भोये, पोउपनि/दिपक मेढे, महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, विजय पवार, गणेश लोंढे, फुरकान शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे, अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांनी केलेली आहे.



