संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक 12/01/2026
नेवासा तालुक्यातील चांदा येथे गावठी कट्टयातुन गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत एक जण ठार झाला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दि 11/
01/2025 रोजी सोनई पोलिस स्टेशन हद्दीत चांदा गाव शिवारात आरोपी सुरज लतीफ शेख वय 23 वर्ष रा चांदा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर याच्या शेतात कंदुरीचा/जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे यातील मयत इसम शाहिद राज महंमद शेख वय 23 वर्ष रा चांदा हा सदर कार्यक्रमात बोकड कापण्यासाठी गेलेला होता.सदर ठिकाणी साधारण 16.45 ते 17.00 वा चे सुमारास यातील मयत शाहिद शेख तसेच आरोपी सुरज लतीफ शेख व अक्षय जाधव यांच्या त वाद झाल्यामुळे आरोपींनी अग्निशस्त्रातून फायर करून शाहिद राजमह्म्मद शेख याचा खून केला आहे. मृतदेह पोस्टमार्टम करणे कामे सिविल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे पाठवण्यात आलेला असून आरोपींचा शोध घेणे कामे पथक रवाना करण्यात आले आहे.एफ आय दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास करीत आहोत. नेवासा तालुक्यातील सध्या वाढती गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसून येत आहे. तालुक्यात गावठी कट्टे येतात कोठुन हा फार मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. पोलिस याकडे दुर्लक्ष करता का असा सवाल जनता विचारत आहे. अगदी किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर गोळीबार होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत असून याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी चर्चा सुरू आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे असे सांगितले आहे.



