भेंडा येथील श्री विठ्ठल अर्बन बँकेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा, दिनांक -25/12/2025
भेंडा येथील श्री विठ्ठल अर्बन बँकेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप .
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडे बु
येथील श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटीव्ह
क्रेडिट सोसायटी यांच्या 9 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापनदिना निमित्त भेंडे बु येथील जिल्हा
परिषद शाळेतील विद्यार्थाना वही, पेन,
पेन्सिल, गुलाबपुष्प, बिस्किटे व शालेय
साहित्याचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे
संस्थापक अध्यक्ष कृष्णा गव्हाणे व प्रवीण
उंडे यांच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रम
राबविण्यात आला. पत्रकार प्रा. संतोष
सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रसंगी त्यांनी सामाजिक उपक्रमाबद्दल
संस्थेच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा
दिल्या. प्रसंगी चेअरमन कृष्णा गव्हाणे,
बाळासाहेब कोलते, किशोर वायकर,
संदीप जावळे, संतोष औताडे(पञकार), हौशीराम
नवले, विजय गव्हाणे, सुनिता गव्हाणे,
सुलभाताई साबळे, संजय गव्हाणे, दत्तू
आघाव, सुरेश भुसारी, शिवाजी फुलारी,
संदीप गव्हाणे, सतीश शिंदे, मारुती
धुमाळ, मुख्याध्यापक रामभाऊ गवळी,
विमल देवकर, मॅनेजर सुरेश दरवडे,
प्रवीण उंडे, कृष्णा मांडलिक, शुभम
आढागळे, भगवान फुलारी, बाळासाहेब
तागड, अमोल दरवडे, महेश गव्हाणे,
चंद्रकला निकम आदींसह ग्रामस्थ व
विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल
मान्यवरांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या .
अती अल्पावधी काळात नावारूपाला आलेली श्री विठ्ठल अर्बन नेहमीच सामाजिक. शैक्षणिक, कार्यक्रमात अग्रेसर असते या उपक्रमाला परिसरातील नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



