अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व आपदा मिञ प्रशिक्षणास सुरवात.
संतोष औताडे मुख्य संपादक- नेवासा) दिनांक-01फेब्रुवारी 2023
सविस्तर माहिती- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ,राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) अहमदनगर यांच्या वतीने हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ या ठिकाणी दिनांक 26 डिसेंबर 2022 पासून प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली होती.या प्रशिक्षणाची सुरवात प्रार्थनेने केली जाते तर राष्ट्रगीताने या प्रशिक्षणाचा शेवट केला जातो. संपुर्ण महाराष्ट्रात 20 ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जात असुन. अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, डॉ विरेंद्र बडदे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात 500 आपदा मिञ /आपदा सखी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षण कालावधीत आरोग्य विषयक माहिती (प्रथमोपचार), पूर, रासायनिक आपत्ती शोध व बचावाच्या वेगवेगळ्या पद्धती, दोरीच्या वापर तसेच स्ट्रेचर वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहे.त्याच बरोबर अग्नीशमन विषयक प्रात्यक्षिके व माहिती ,भुकंप तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती या विषयावर माहिती देण्यात आली होती.रोज सकाळी योगासने घेतली जातात, आपदा मिञ/आपदा सखी 2022-23 या प्रशिक्षणात अनेक प्रशिक्षणार्थीनीं आपला सहभाग नोंदवला होता. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून मा.योगेश परदेशी सर,मा.गिरिश उपाध्याय सर, मा.लखन गायकवाड सर,के ऐ महाजन सर यांनी प्रशिक्षण दिले तर प्रशिक्षणासाठी समन्वयक म्हणून श्री .वाघ सर,श्री गर्जे सर हे काम पहात आहेत.