ब्रेकिंग
Trending

अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या कडून 34 जणांचा हद्दपार प्रस्ताव.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा                   दिनांक -01/02/2026                                  सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने माहे जानेवारी २०२६ मध्ये अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभागातील एकुण ३४ इसमांविरुध्द हददपार प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना सादर.
आगामी सण / उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस दलाने
गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ (Zero Tolerance) धोरण
स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर
प्रतिबंधक कारवाया करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशन यांना दिलेले आहे.
मा. श्री. सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांनी माहे नोव्हेंबर व डिसेंबर
२०२५ मध्ये श्रीरामपुर विभागातील ( अहिल्यानगर उत्तर जिल्हा) १७ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील
मागील १० वर्षांतील (२०१६ ते २०२५) सर्व गुन्हेगारांचा सविस्तर ‘क्राईम डेटाबेस’ (Crime
Database) तयार केला आहे. त्यामधील सक्रीय व क्रियाशील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी
आणि प्रतिबंधात्मक कारवाई साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी
सदर डाटाबेसचा खुप उपयोग होणार आहे. सदर डाटाबेस मध्ये आरोपींचे वय, गुन्ह्याचा प्रकार
(शरीरविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे, अंमली पदार्थ इ.), आणि त्यांच्या गुन्हे करण्याची पद्धत (Modus
Operandi) तसेच मागील १० वर्षांत किती आरोपी पुन्हा पुन्हा गुन्हे करत आहेत याची स्वतंत्र
यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जे गुन्हेगार वारंवार गुन्हे करत आहेत आणि
ज्यांच्यामुळे सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होत आहे, अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई
करण्याचे सोयीस्कर झाले आहे.
माहे जानेवारी २०२६ मध्ये याच मोहिमेअंतर्गत मानवी जिवीतास किंवा मालमत्तेस भय,
इजा किंवा धोका निर्माण करणाऱ्या किंवा तसा संभव असणाऱ्या व्यक्तीवर मुंबई पोलीस
अधिनियम १९५१ चे कलम ५५, ५६ चे तरतुदींनुसार एकुण ३४ व्यक्तींवर हद्दपारीचे प्रस्ताव
मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभागातुन पाठविण्यात आले
आहे. त्यामध्ये शरीरविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे, अंमली पदार्थ इ. प्रकारचे गुन्हे सदर आरोपींवर
दाखल आहे.
माहे जानेवारी २०२६ मध्ये श्रीरामपुर विभागातील खालील इसमांवर हददपार प्रस्ताव
पाठविण्यात आलेले आहेत.अहिल्यानगर जिल्हयात सराईत गुन्हे करणा-या व्यक्ती / टोळीचा बिमोड करण्यासाठी
जिल्हयातील शरीराविरुध्दचे, मालाविरुध्दचे, गोवंशीय कायदयान्वये, भारतीय हत्यार कायदयान्वये तसेच वाळु
चोरीचे तसेच इतर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार इसमांची माहिती संकलीत करुन त्यांचे विरुध्द हद्यपारीची
कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच यापुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगार व्यक्ती / टोळीची माहिती संकलीत
करण्याचे काम सुरु असुन त्यांचे विरुध्दही हद्दपारीची कार्यवाही करणार आहे.
समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार
नाही. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५, ५६ तसेच नवीन फौजदारी कायदयाचे तरतुदी
नुसार गुन्हेगारांवर अधिक कडक आणि जलद कारवाई केली जात आहे. Crime डेटाबेसमुळे
तपासाची गती वाढणार असून, कोणताही आरोपी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकणार नाही. नवीन
कायद्यांमधील तरतुदींचा प्रभावी वापर करून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी हा डेटाबेस ‘कणा’
ठरणार आहे.सदरचा Crime Data हा केवळ एका पोलीस स्टेशन पुरता नसुन पुर्ण अहिल्यानगर
जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचा गुन्हे रेकॉर्ड यात संकलित केला आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पुन्हा
गुन्हा केल्यास त्याचेवर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करणे शक्य होणार आहे.
नागरीकांच्या जिवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी तसेच सार्वजनिक शांतता व
सुव्यवस्था अबाधित ठेवणेसाठी सदरचे तडीपार प्रस्ताव रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुध्द तयार करण्यात आले
आहे. प्रस्ताव तयार करण्याचे काम मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ
वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर, श्री.
अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी, श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी,
संगमनेर, श्री. निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. नितीन देशमुख,
स.पो.नि.गणेश जाधव, स.पो.नि. रामचंद्र शिखरे, पो.स.ई. दादाभाई मगरे, पो. स. ई. अप्पासाहेब हंडाळ
श्रीरामपूर शहर पो.स्टे., पो. नि. अरुण धनवडे, पो. स. ई. सतिष डौले श्रीरामपूर तालुका पो.स्टे., पो. नि. संजय
ठेंगे स.पो.नि. सुदाम शिरसाठ, पो. स. ई. समाधान फडोळ, पो.स.ई. गणेश वाघमारे, पो.स. ई. राजु जाधव राहुरी
पो.स्टे., पो.नि. रामकृष्ण कुंभार, स. पो. नि. डी. एस. सोनवणे, पो.स.ई. दिपक रोठे, पो.स. ई. संदिप सोन्ने
कोपरगाव शहर पो.स्टे., पो. नि. संदिप कोळी, स. पो. नि. धरमसिंग सुंदरडे, पो. स. ई. कमलाकर चौधरी कोपरगाव
तालुका पो.स्टे., पो.नि. रणजित गलांडे, पो. स. ई. निवांत जाधव, पो. स. ई. सागर काळे शिर्डी पो.स्टे.,
पो.नि.नितीन चव्हाण, म.स.पो.नि. संगीता गिरी, पो. स. ई. शरद लेंडे, म.पो.स.ई . कोमल कुमावत राहाता पो.स्टे.,
स.पो.नि. कैलास वाघ, पो.स.ई आशिष चौधरी लोणी पो.स्टे., समीर बारवकर, स. पो. नि. अनिल मोरे, पो. स. ई.
संतोष पगारे, पो. स. ई. श्रीकांत जाधव, पो. स. ई. इम्रान खान, म.पो.स. ई. फराहनाज पटेल, संगमनेर शहर
पो.स्टे., पो.नि. प्रविण साळुंके, स.पो.नि. विकास काळे, पो.स. ई. शालोमन सातपुते संगमनेर तालुका पो.स्टे.,
पो.नि. मोहन बोरसे, पो.स.ई विनोद खांडबहाले अकोले पो.स्टे., स.पो.नि. हेमंत थोरात, पो.स. ई. अजय कौटे
घारगाव पो.स्टे., पो.नि. महेश पाटील, स.पो.नि. अमोल पवार, पो. स. ई. मनोज आहिरे, पो. स. ई. विकास पाटील,
म.पो.स.ई श्रध्दा वैद्य नेवासा पो.स्टे. यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे