ब्रेकिंग
Trending

राहुरी येथे रॉंग साईडने वाहन चालवना-या 55 वाहनावर कारवाई 37100/ रुपये दंड वसूल

संतोष औताडे -मुख्य‌‌‌ संपादक ,नेवासा      दिनांक -31/01/2826

सविस्तर माहिती – राहुरी येथील अहिल्यानगर- मनमाड रोड वर ंरॉंग साईडने वाहन टाकणाऱ्या 55 वाहनावर कारवाई करून एकूण 37100/ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

सध्या अहिल्यानगर ते मनमाड जाणाऱ्या महामार्गाचे काम चालू असून राहुरी शहरांमध्ये एकेरी वाहतूक करण्यात आली आहे तरी सदर वाहतूक ही मंद गतीने चालू असते तरी गर्दीमध्ये रॉंग साईडने आपली वाहने घेऊन येऊन सदरची वाहतूक ही जाम केली जाते अशा वाहन चालकावर आज दिनांक 31’1.2026 रोजी रॉंग साईडने वाहन टाकणाऱ्या 55वाहनावर 37100/दंड वसूल करण्यात आला आहे.

तरी याद्वारे नागरिकांना अहवान करण्यात येते की आपण आपली वाहने एकेरी लेनमध्ये ठेवावी कोणतीही वाहने रॉंग साईडने टाकू नये जेणेकरून ट्राफिक जामच्या प्रश्नाला आपणास सामोरे जावे लागेल व त्यामुळे सामान्य नागरिकांना नाहाक त्रास होतो व आपणास दंडात्मक कारवाई सामोरे जावे लागेल अशी राहुरी पोलीस स्टेशन वाहतूक विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूरयांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आव्हाड पोलीस पोलीस हवालदार ठोंबरे ,दरेकर , यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे