संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा, दिनांक -09/01/2026
विठ्ठल अर्बन बँकेच्या वतीने ‘पत्रकार सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न.सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री विठ्ठल अर्बन क्रेडिट सोसायटी लि.भेंडा बु या शाखेच्या वतीने 6 जानेवारी 2026 हा दिवस आद्य पञकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील जेष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेत, विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने स्थानिक पत्रकारांसाठी ‘विशेष सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील नामवंत पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे , चेअरमन,व्हा चेअरमन,सर्व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन म्हणाले की, “बँकिंग क्षेत्रातील चढ-उतार आणि जनसामान्यांच्या समस्या, अन्याय होत असेल तर त्याची माहिती आपल्या लेखनातून समाजापर्यंत व प्रशासना पर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. विठ्ठल अर्बन बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून ती सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे.

या पञकार सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार सुखदेव फुलारी -दैनिक सार्वमत, कारभारी गरड सर- दैनिक पुढारी, पुरोहित साहेब दैनिक लोकमत, सोनवणे सर , रमेश पाडळे साहेब, संतोष औताडे- अहिल्यानगर पोलिस टाइम्स, यांचा शाल, श्रीफळ,व विठ्ठलाचा फोटो देऊन विशेष गौरव करण्यात आला.
या पञकार सन्मान कार्यक्रमाला पत्रकार बांधव, चेअरमन -कृष्णा गव्हाणे,व्हा चेअरमन- संतोष औताडे,संचालक बाळासाहेब कोलते, संचालक हौसिरामनवले, संजय गव्हाणे, डॉ लहाणु मिसाळ, गणेश महाराज चौधरी, सुधीर चक्रणारायण, मॅनेजर सुरेश दरवडे , कृष्णा मंडलिक, शुभम आढागळे, भगवान फुलारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



