
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -06/01/2026
राहुरी पोलिसांकडून शंभराव्या अल्पवयीन अपहरण झालेल्या मुलीचा शोध .ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत राहुरी पोलिसांकडून मागील 9 वर्षात अपहरण झालेल्या तब्बल 100 मुलींचा मागील दोन वर्षात शोध घेऊन पालकांच्या ताब्यात….
मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे साहेब यांच्याकडून ऑपरेशन मुस्कान चे कौतुक व शुभेच्छा*
राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत तिच्या पालकांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 2 9 2025 रोजी गुन्हा दाखल केलेला होता .
सदर अल्पवयीन मुलीचा काल दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी शोध घेऊन राहुरी पोलिस तपास पथकांनी ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
दि.02/09/2025 रोजी पहाटे 05:00 वाजेच्या सुमारास सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ही राहते घरातून कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता . सदर मुलीचा राहुरी पोलिस स्टेशन पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले की ,आईचा व तिचा घरगुती कारणावरून वाद झाल्याने रागाने ती तिच्या आईच्या मामाकडे निघून गेली व तेथे जाऊन मामाला सांगितले की मी रागाने आले आहे माझ्या घरी जर सांगितले तर मी इथूनही निघून जाईल अशी धमकी दिल्याने तिच्या आईच्या मामाने मुली बाबत कोठेही माहिती दिली नाही.
सदर मुलीचे कौन्सिलिंग करत वस्तुस्थिती विचारण्याचा प्रयत्न केला , परंतु मुलगी ती देत असलेल्या जबाब वर ठाम असल्याने तिला मान्य न्यायालयापुढे पाठवून ती सांगते त्याप्रमाणे तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे
परंतु सदर मुलगी देत असलेल्या जबाब हा वस्तुनिष्ठच आहे याबाबत तपास पथकाची खात्री नसल्याने राहुरी पोलीस स्टेशन पथक सदर अल्पवयीन मुलीचे कौन्सिलिंग करत सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे . अल्पवयीन मुलगी तीन महिने घर सोडून गुप्त पद्धतीने राहिल्यानंतर अशा प्रकारे देत असलेल्या जबाब बाबत साशंकता असल्याने सदर अपहरण प्रकरणात अन्य काही बाबी आहे अगर कसे याबाबत तांत्रिक विश्लेषण व ती ज्या नातेवाईकाकडे राहिली त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती न दिली याबाबत कसून तपास सुरू आहे .
सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, पोहेकॉ / राहुल यादव , पोकॉ. गणेश लिपने, पोकॉ. सचिन ताजने, मपोहेकॉ. स्वाती कोळेकर . मपोकॉ. वंदना पवार यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास पोसई / राजू जाधव, पोकॉ. गणेश लिपने हे करीत आहेत.
काल दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी श्रीरामपूर येथे श्रीरामपूर विभागाच्या इन्स्पेक्शन च्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे माननीय पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे साहेब व पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब राहुरी पोलीस स्टेशनच्या ऑपरेशन मुस्कान चे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तसेच बेलवंडी परिसरात वेगवेगळे राज्यातील विविध रेल्वे स्टेशन वरून किडनॅप करून आणलेल्या व वेठबिगारीत बंदिस्त जीवन कंठणाऱ्या गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या 23 वेठबिगारांच्या मुक्ततेबाबतही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे व बेलवंडी पोलीस स्टेशनच्या तत्कालीन टीमचे कौतुक केले .*



