अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या लेखापरीक्षण विभागात लागलेल्या आगीत काही भाग जळून खाक.

संतोष औताडे /मुख्य संपादक. दि.01 एप्रिल 2022
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या लेखापरीक्षण विभागात लागलेल्या आगीत काही भाग जळून खाक.
सविस्तर माहिती-अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यालयात लागलेल्या आगीत काही भाग जळुन खाक झाला आहे.घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर तातडीने महापालिका व एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यामुळे आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला.
जिल्हा बँकेच्या चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगी संदर्भात संशय बळावत असून याची सखोल चौकशी करून दोषीं आढळल्यास कारवाई केली जाईल असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी घटनास्थळी व्यक्त केले. जिल्हा बँकेच्या तिसर्या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि जिल्हा बँकेची काही विभागाची कार्यालये आहेत. सायंकाळी 6.45 वाजता बँकेच्या लेखापरीक्षण विभागामधून धूर निघाल्याचे DDR कार्यालयाच्या कर्मचार्यांना निदर्शनास आले. सदर विभागाचा दरवाजा बंद होता. आम्ही तातडीने अग्निशामक दलास पाचारण केले. तोपर्यंत DDR कार्यालयाच्या कर्मचारी आणि बँकेच्या स्टाफ च्या मदतीने उपलब्ध संसाधन च्या मदतीने आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. त्यानंतर मनपा आणि MIDC च्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनी आग विझवण्यामध्ये यश आले.
सदर आगीमध्ये बँकेच्या लेखापरीक्षण विभागाची खोली पूर्णपणे जळून खाक झाली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अजिबात नुकसान झालेले नाही. कोणत्याही प्रकारची जीवितहानी/ दुखापत झालेली नाही.
प्राथमिक अंदाजानुसार विजेच्या shock सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज आहे.