21वर्ष पूर्ण करत नागेबाबा गृप ने पावागड गुजरात येथुन आणलेल्या पायीअमर ज्योतीचे भेंडा येथे भव्य स्वागत

संतोष औताडे- मुख्य संपादक,नेवासा दिनांक – 23/09/2025
सविस्तर माहिती – नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा गृप ने 21वर्ष पूर्ण करत पावागड कालिकामाता गुजरात येथुन आणलेल्या पायी अमर ज्योतीचे श्री क्षेञ भेंडा येथे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. स्त्रीशक्तीला हा उत्सव समर्पित केला गेल्याने वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि दैवी शक्तीचे हा सण प्रतीक आहे. ‘नव’ म्हणजे नऊ आणि ‘रात्री’ म्हणजे रात्र या नऊ रात्रींमध्ये भक्त दुर्गा देवीच्या विविध रुपांची पूजा करतात. तसेच देवीचे घट बसवून व्रत करतात. या शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना केली जाते. संपूर्ण नऊ दिवस नऊ रात्री देवीची पूजा आणि गोंधळ घालून देवीच्या मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्राची सुरुवात कलश प्रतिष्ठापनेने होते. नेवासा तालुक्यातील श्री क्षेञ भेंडा येथील नागेबाबा गृप ने हा उपक्रम सातत्याने चालू ठेवत
२१ वर्ष पूर्ण केले आहे. भेंडा येथील
नागेबाबा ग्रुप यांनी
नवरात्र उत्सव – २०२५
पायी आमर ज्योत भेंडा ते पावागड, कालिकामाता, गुजरात या ठिकाणाहून भेंडा बु येथे आणली आहे. महाराष्ट्र नाही तर बाहेरील राज्यात पावसाने थैमान घातले आहे. परंतु तरीदेखील नागेबाबा गृप मधील तरुणांनी भक्तीभावाने पायी अमर ज्योत आणण्याचे काम केले आहे. या संपूर्ण प्रवासात यामध्ये प्रत्येक 5 जणांचा गृप तयार करून रोज 90 ते 100 किमी चे अंतर पार करत सुमारे 600 किमी चा प्रवास करत हि पायी अमर ज्योत श्री क्षेञ भेंडा येथे आणण्यात आली , यावेळी गावातील नागरिकांनी देखील मोलाचे सहकार्य केले होते. नागेबाबा गृप चे सदस्य अशोक भाऊ साळवे यांनी याचे आयोजन केले होते.यापुढील काळातही असेच भक्तीभावाने देवीची ज्योत आणण्यात येईल असे नागेबाबा गृप च्या वतीने सांगण्यात आले.