क्रिडा व मनोरंजन

भेंडा येथे एकदिवसीय वैष्णव मेळाव्याचे आयोजन

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा                  दिनांक-17/04/2026


भेंडा येथे एक दिवसीय वैष्णव मेळाव्याचे आयोजन. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील संत नागेबाबा भक्त निवास येथे एक दिवसीय वैष्णव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय संत ब्राह्मलीन सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण, यांच्या आशीर्वादाने व  हभप साहेबराव महाराज गव्हाणे यांच्या प्रेरणेने एक दिवसीय वैष्णव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला दिंडी मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर धर्म ध्वजारोहण करण्यात आले.विनापुजन, कलशपुजन,संत मालिका पुजन , गुरू पुजन करून या मेळाव्याची सुरुवात झाली. या वैष्णव मेळाव्यासाठी भेंडा व पंचक्रोशीतील नागरिकांनी हजेरी लावली होती.

आज सोनियाचा दिनू वरूषे अमृताचा धनु हरी पाहिलारे हरी पाहीला, गुरू घाली ज्ञानांजन गुरू दाखवी निरंजन या वाक्याचा अर्थ घेऊन या मेळाव्याची सुरुवात झाली. या मेळाव्यात सकाळच्या सत्रात युवा किर्तनकार हभप परमेश्वर महाराज गारूळे ,यांचे हरी किर्तन झाले. हभप साहेबराव गव्हाणे महाराज यांनी प्रवचन सेवा केली तर दुपारच्या सत्रात हभप एकनाथ महाराज सायकडबाबा यांचे कीर्तन झाले व सायंकाळी हभप गुरूवर्य धनराज महाराज पाटील यांचे किर्तन झाले,आलेल्या

सर्व भक्त साधकांसाठी दुपारी श्री चंद्रकांत चौधरी तर सायंकाळी कृष्णा गव्हाणे (चेअरमन विठ्ठल अर्बन) यांनी स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती. या एक दिवसीय वैष्णव मेळाव्यासाठी हभप सिताराम महाराज पठाडे,श्री शिवाजी तागड,श्री अशोक दादा मिसाळ, डॉ शिवाजी शिंदे, डॉ,लहानू मिसाळ,श्री रामचंद्र गंगावणे,श्री शिवाजी फुलारी,श्री वाल्मीक लिंगायत,श्री अविनाश वाडकर, राजेंद्र चिंधे, लहुभाऊ गारूळे, संभाजी मिसाळ, भगवान फुलारी

संतोष औताडे (पञकार) ,सुनिता ताई गव्हाणे, भाग्यश्रीताई गांरूळे,महादेव महाराज धाडगे,हभप कावेरी ताई पठाडे, विठ्ठल महाराज नाईक, दिंगबर महाराज चौधरी, भाऊसाहेब महाराज चौधरी,हभप अंकुश महाराज कादे तसेच पंचक्रोशीतील नागरिक, विठ्ठल अर्बन पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे