राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा आदिती तटकरे यांच्याकडून श्रीरामपूर पोलिसांचे कौतुक.
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -27/10/2026. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी नवरात्री दरम्यान महिला सुरक्षिततेसाठी राबविलेल्या उपक्रमाचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा आदिती तटकरे यांच्याकडून कौतुक.
अपर पोलीस अधीक्षक श्रीअरामपुर यांनी या नवरात्री दरम्यान
*महिला व मुलींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी नवरात्री दरम्यान अनोखा उपक्रम राबवला होता .
नवरात्री उत्सव २०२६ दरम्यान श्रीरामपूर विभागातील महिला व मुली यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी श्रीरामपूर विभागामध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता . श्रीरामपूर विभागामध्ये एकूण १७ पोलीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सन २०२५ व सन २०२६ या दोन वर्षात महिला मुली यांनी तक्रारी दिल्यावरून जे गुन्हे दाखल झालेले असतील त्याच मुख्यत्वे करून छेडछाड विनयभंग बलात्कार या गुन्ह्यांची मागील दोन वर्षाची संपूर्ण माहिती एकत्रित करण्यात आली. त्यानुसार या दोन वर्षात बलात्काराचे २५१ व विनयभंगाचे ६६६ असे एकुण ९१७ गुन्हे नोंद आहे.
तक्रार दाखल केलेल्या या महिलांचे तक्रारी संबंधाने झालेल्या सविस्तर कारवाईचा अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी आढावा घेण्यात आला. व त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षकांसमवेत सात महिलांचे एक टिम तयार करण्यात आली होती व नवरात्री दरम्यान यातील प्रत्येक तक्रारदार महिलेला मोबाईल नंबर वर संपर्क साधण्यात आला. व त्यांना फोन करून त्यांनी दिलेल्या तक्रारीचे निराकरण योग्य पद्धतीने झाले किंवा काय? त्याचप्रमाणे त्यातील जो कोणी आरोपी होता? तो आरोपी सध्या त्या महिलांना काही त्रास देतो किंवा कसे याबाबतची खात्री करण्यात आली.
यातील ९१७ मुली व महिला तक्रारदारांना अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला टिमने संपर्क केला त्यांना संबंधित आरोपी पुन्हा काही त्रास देत आहे काय? त्याचे पासून कोणत्याही स्वरूपाचा आणि गैरप्रकार या आरोपीकडून होत आहे किंवा कसे? पाठलाग वगैरे करण्याचा गैरप्रकार आरोपी करत आहे काय या सर्व बाबींची खात्री करण्यात आली. त्यापैकी ८४६ मुलींनी पोलिसांनी आम्ही दिलेल्या तक्रारीवर योग्य कारवाई केली आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली व संबंधित आरोपीकडून त्यांना सध्या कोणताही त्रास नसल्याची सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर कॉल केलेल्या महिलांपैकी ७१ महिलांनी मात्र त्या आरोपीकडून त्यांना पुन्हा आजही त्रास होत असल्याचे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने संबंधित आरोपीकडून त्यांना कोणत्या स्वरूपाचा त्रास आहे याची देखील सविस्तर माहिती घेण्यात आली आहे.
एकंदरीतच ज्या ज्या महिलांनी मागील दोन वर्षांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे आरोपींविरुद्ध दाखल केलेले आहे त्यांच्या गुन्ह्यांबद्दल झालेल्या कारवाईचा थेट तक्रारदार महिलांशी संपर्क साधून आढावा घेण्यात आला त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली त्यानंतर पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईवर ९३% पेक्षा जास्त मुलींनी व महिला तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे, शिवाय त्यातील आरोपीकडून त्यांना सध्या कोणताही त्रास नसल्याचे देखील नमूद केले आहे. फक्त ७ % मुलींनी मात्र गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा आरोपीचा त्रास सुरू असल्याचे सांगितले आहे त्यावर आम्ही स्वतः लक्ष घालून येत्या दहा दिवसात संबंधित आरोपींवर गंभीर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत शिवाय नमूद तक्रारदार महिला या गुन्हा दाखल करण्यास तयार असल्यास त्याबाबत नव्याने गुन्हा देखील दाखल करणार आहोत.
या उपक्रमाची राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी दखल घेऊन उपक्रमाचे कौतुक केले आहे.त्यांनी स्वत आपल्या इंस्टा अकाउंट वरून उपक्रमाचे कौतुक केले आहे . व जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक यांचे कौतुक केले आहे.
प्रशासनात नवीन उपक्रम राबविणाऱ्या अधिकारी यांचेसाठी सदर ची बाब ही नक्कीच प्रेरणादायी आहे . अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे श्रीरामपूर यांनी राबविलेले हा उपक्रम नक्कीच राज्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे व संपूर्ण राज्यभर राबविला जाण्याची अपेक्षा आहे.
पहिल्यांदाच श्रीरामपूर पोलिसांचा असा काही उपक्रम राज्याने दाखल घेतली असा ठरला आहे



