गुन्हेगारी
Trending

राञीच्या वेळी विनापरवानगी रस्त्यावर डीजे वाजवल्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई.

संतोष औताडे -मुख्य संपादक,नेवासा                              दिनांक – 25/10/2026      सविस्तर माहिती- श्रीरामपूर गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या काही आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी रात्रीच्या वेळी डीजे लावून बेकायदेशीरपणे मिरवणूक काढली. यावेळी रस्ता अडविणे तसेच सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडण्या-या वर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.. अशा प्रकारे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

श्रीरामपूर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सदर प्रकरणातील जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी करून त्यांचा जामीन रद्द करण्याबाबत संबंधित तपास यंत्रणेमार्फत सक्षम न्यायालयात आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच, संबंधित आरोपींविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार तडीपारीची कारवाई करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येईल.

या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. गुन्ह्यात वापरलेला dj जप्त केला असून dj मालकला देखील अटक केली आहे .

कायदा उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही असेही पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे