कुकाणा येथे विनापरवाना डीजे/डॉल्बी वाजवल्या प्रकरणी पोलिसांकडून डिजे जप्त करून गुन्हा दाखल.

संतोष औताडे -मुख्य संपादक ,नेवासा दिनांक -16/09/2026
कुकाणा येथे विनापरवाना डीजे/डॉल्बी वाजवल्या प्रकरणी पोलिसांकडून डिजे जप्त करून गुन्हा दाखल.
सविस्तर माहिती- नेवासा पोलीस ठाणे हद्दीत मा जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील क्र डी सी कार्य 9 ब 1 /2135/2026 दिनांक 12/09/2026 अन्वये आदेशाने अहिल्यानगर शहर व ग्रामीण भागात दिनांक 14-09-2026 ते 20-10-2026 या कालावधीत गणेश उत्सव, नवरात्र उत्सव दसरा उत्सवचे अनुषंगाने डी जे /डॉल्बी वाजवण्यास बंदी असताना देखील कुकाणा–भेंडा जाणारे रोड वर कुकाणा बस स्टँड येथे करण कर्कश आवाजात गाणे डीजे/डॉल्बी वर वाजविताना इसम नामें डीजे मालक नबीश बादशहा सय्यद राहणार गंगापूर व डीजे ऑपरेटर विठ्ठल राहणार जामगाव असे मिळून आल्याने व त्यांना डीजे डॉल्बी वाजवणे बाबत आवश्यक कागदपत्राची मागणी केली असता त्यांनी कागदपत्र केली नाही ते अनाधिकृत पणे सदर ठिकाणी डीजे वाजवत होते त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे 772/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणी नेवासा पोलीस ठाणे येथे संबंधित इसमाविरुद्ध कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करून डीजे डॉल्बी वाहनासह जप्त करण्यात आला आहे
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल काळोखे हे करत आहेत
सदरची कारवाई श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक, श्री सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री निरज राजगुरू उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली
पोहेकॉ/बंटी काळोखे, शाहजी आंधळे, बाबा वाघमोडे, पो कॉ /श्रीनाथ गवळी, ज्ञानेश्वर रसाळ नवनाथ शेकडे होमगार्ड/ बबलू चव्हाण, गंगावणे अरबाज शेख यांनी केली आहे.



