उस्थळरोड नेवासा येथील दरोड्यातील आरोपी विंचूर, जिल्हा नाशिक येथुन जेरबंद नेवासा पोलिसांची कारवाई

संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा दिनांक- 11/10/2026
उस्थळ रोड नेवासा येथील दरोड्यातील आरोपी विंचूर, जिल्हा नाशिक
येथुन जेरबंद नेवासा पोलिसांची कारवाई.
सविस्तर माहिती- दिनांक 03/10/2026 रोजी 23.00 वा. ते दिनांक 04/10/2026 रोजी पहाटे
03.00 वा.चे दरम्यान फिर्यादी यांचे राहते घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन फिर्यादीचे हात पाय बांधुन लाकडी
दांडके व लोखंडी गजाने मारहाण करुन 1,27,500/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ची बळजबरीने
चोरी केली. वगैरे मा. च्या फिर्यादीवरुन नेवासा पो.स्टे गु.र.नं. 827/2026 भा. न्याय संहिता कलम 310(2), 118 (2),
115(2), 351(2) प्रमाणे दिनांक 04/10/2026 रोजी दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तपास पथकातील पो. उपनिरीक्षक विकास
पाटील, पो.हे.कॉ/833 किरण पवार, पो. कॉ/2401 सुमित करंजकर, पो. कॉ/2659 नारायण डमाळे,
पो.कॉ/2598 अतुल शेळके, पो.कॉ / 990 परमेश्वर गहाळ, पो.कॉ / 2403 सुनिल गंगावणे, पो.कॉ / 1454 गणेश जाधव
यांना आदेशित करुन अश्या पध्दतीने दरोडा घालणारे आरोपी यांची माहिती घेवुन साक्षीदार यांना काही फोटो
दाखवले असता त्यातील वय 42 वर्ष, हल्ली रा.ए ब्लॉक हरेगाव ता. श्रीरामपुर जिल्हा अहिल्यानगर यास ओळखले
असता आरोपी हा घटनेच्या दिवशी नेवासा येथे आले असल्याचे निष्पन्न झाल्याने तो तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त
बातमी दारामार्फत माहिती घेतली असता तो विंचुर जिल्हा नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास विंचुर
जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
गु.र.नं.व कलम
T 690/2026 भा. न्याय संहिता कलम 309 (6), 3 (5) प्रमाणे
T 827/2026 भा. न्याय संहिता कलम 310 ( 2 ), 118(2),115 (2),351 (2) प्रमाणे
कोपरगाव 1579/2026 भा. न्याय संहिता कलम 309 (4) वगैरे
आरोपी नामे संतोष भगवान काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे.
पोलीस ठाणे
गु.र.नं.व कलम
1-T97/2018 भा.दं.वि. कलम 396 वगैरे
कर्नाटक राज्य
2-येवला
T225/2011 भा.दं.वि. कलम 395, 397, 307 वगैरे
जिल्हा नाशिक
वय 42 वर्ष यास नेवासा पो.स्टे गु.र.नं. 827 / 2026 मध्ये अटक करण्यात आली असुन त्याचे कडेस आणखी गुन्हे
उघडकीस होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. सुदर्शन साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ
वाकचौरे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निरज राजगुरु साहेब शेवगाव उपविभाग, शेवगाव यांनी
दिलेल्या मार्गदर्शन व सुचने प्रमाणे नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वात
पो.उपनिरीक्षक विकास पाटील, पो.हे.कॉ/833 किरण पवार, पो.कॉ / 2401 सुमित करंजकर, पो. कॉ/2659 नारायण
डमाळे, पो.कॉ / 2598 अतुल शेळके, पो.कॉ / 990 परमेश्वर गहाळ, पो.कॉ / 2403 सुनिल गंगावणे, श्रीरामपुर सायबर
सेलचे पो.हे.कॉ/ संतोष दरेकर, पो. कॉ/सचिन धनाड यांनी केली आहे.



