आगामी गणेशोत्सव 2026 च्या अनुषंगाने शेवगाव शहरात पोलीस व SRPF यांचा संयुक्त रूटमार्च.
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -12/09/2026. . आगामी गणेशोत्सव 2026 च्या अनुषंगाने शेवगाव शहरात पोलीस व SRPF यांचा संयुक्त रूटमार्च.

सविस्तर माहिती- अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज दि. 12/09/2026 रोजी दुपारी 15:40 वा ते 16:40 वा दरम्यान शेवगाव शहरात भव्य पोलीस रूट मार्च घेण्यात आला.
या वेळी शहरात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
क्रांती चौक -> छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन बाजार पेठ -> भगतसिंग चौक -नाईकवाडी मोहल्ला -> वडार गल्ली -> कापड बाजार पेठ -> छत्रपती शिवाजी महाराज चौक -> मोची गल्ली -> डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक -> मिरी रोड -> *शेवगाव पोलीस स्टेशन

– SRPF ग्रुप 19, कुसडगाव: पोनि एस. कराळे, उपनिरी एस. डी. कवठेकर व *81 SRPF जवान तसेच
शेवगाव पोलीस स्टेशन चे
पोनि मोहन बोरसे साहेब,
– पोउपनिरी विनोद खांडबहाले, विलास जाधव, रामहरी खेडकर
– गोपनीय पोलीस अंमलदार – पोकॉ संतोष वाघ,पोकॉ श्याम गुंजाळ
– एकूण 4 पोलीस अधिकारी, 42 पोलीस अंमलदार व 25 होमगार्ड हजर होते.
सदर रूट मार्चमुळे शेवगाव शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की गणेशोत्सव काळात सर्व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे, DJ ला पूर्णपणे बंदी असून पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे. शेवगाव चे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सांगितले.



