संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा, दिनांक – 14/09/2026 मागील भांडणाच्या कारणावरून भेंडा पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर अंगावर घालून हत्या.

सविस्तर माहिती-नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील पेट्रोल पंपावर काल सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून नातवाने आपल्या चुलत आजोबांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत सोमनाथ संभाजी साळुंके वय 26 राहणार सौंदाळा,ता नेवासा यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे की दिनांक 12/09/2026 रोजी आरोपी विशाल नंदू आरगडे हा त्याच्या ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवत असल्याने आवाज कमी कर आवाजाने शेळ्या बाजुला
पळत आहे .

असे संभाजी आसाराम साळुंके व आरोपी त्यांचेत एकमेकांना बाचाबाची व शिविगाळ करून दमदाटी झाली होती. त्यावेळी आरोपी याने तुला माझे ट्रॅक्टर खाली घालुन जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली होती..
दुसऱ्या दिवशी सकाळी भेंडा येथील पेट्रोल पंपावर मागील भांडणाचा मनात राग धरुन त्याचे ताब्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक माहित नाही) संभाजी आसाराम साळुंके यांची मोटारसायकल क्रमांक MH16 P 6351 ला जोरदार धडक दिली.व नंतर ट्रॅक्टर अंगावर घालुन त्यांना गंभिर जखमी करून तेथुन पळुन गेला

.यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना नेवासा फाटा येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्यानंतर पुढील उपचारासाठी अहिल्या नगर येथे घेऊन जाण्यासाठी सांगीतले.परंतू अहिल्यानगर येथे उपचारासाठी जात असतांनाच जास्त ञास होऊ लागल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले..म्हणुन मी आरोपी विरोधात तक्रार दाखल करत आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेचा पंचनामा केला. दुपारच्या सुमारास फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. या फिर्यादी वरून आरोपी वर गुन्हा क्रं 0766/2026 भारतीय दंड संहिता कलमानुसार 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पवार करत आहेत.



