ब्रेकिंग
Trending

कल्पना पवार यांची प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक श्रीरामपूर येथे नियुक्ती पतीच्या स्वप्नांसाठी धारण केली खाकी.

संतोष औताडे- मुख्य संपादक,नेवासा.                           दिनांक-23/09/2026           कल्पना पवार यांची प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक श्रीरामपूर येथे नियुक्ती पतीच्या स्वप्नांसाठी धारण केली खाकी.

सविस्तर माहिती- मुंबई येथील २६/११ च्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांची परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक  श्रीरामपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांनी पतीचे अधुरे राहिलेले देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर खाकी वर्दी घेतली आहे. पतीने ज्या खाकी वर्दीत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्याच वर्दीत पत्नीनेही देशसेवेचा संकल्प स्वीकारत इतिहास घडविला आहे.

दुःखाला सामर्थ्यात आणि विरहाला देशसेवेच्या संकल्पात रूपांतरित करणारा त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

थेट नियुक्तीच्या आदेशानंतर कल्पना पवार यांची परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात नियुक्ती झाली. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस आकादमीत ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी प्रभारी पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

वाई तालुक्यातील कवठे गावातील आहेत. देशभक्ती, आणि राष्ट्रसेवेची परंपरा लाभलेल्या या गावाशी त्यांचे नाते आहे. देशभक्त किसनवीर उर्फ आबासाहेब वीर यांच्या देशभक्तीच्या आणि क्रांतिकारी विचारांच्या भूमीतून कल्पना पवार यांनी खाकी वर्दी स्वीकारल्याने गावच्या देशसेवेच्या परंपरेला जणू नवा अर्थ प्राप्त झाला आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. निष्पाप प्रवाशांचे प्राण वाचविताना पोलीस शिपाई अंबादास पवार यांनी कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करले. त्यांच्या हुतात्म्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या आघाताने खचून न जाता कल्पना पवार यांनी पतीच्या बलिदानातून नवी प्रेरणा घेतली.

पतीच्या हुतात्म्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना शहीद कुटुंबाला मिळणाऱ्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कल्पना पवार यांना पोलीस उपअधीक्षक पदाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यावेळी पती प्रमाणेच पोलीस दलात सेवा करण्याची आणि देशसेवेचे त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली होते पतीचे स्वप्न पत्नीने आपल्या खांद्यावर घेतली आहे . अहिल्यानगर चे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, व श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पना पवार त्यांना श्रीरामपूर सारख्या संवेदनशील भागात काम करण्याची संधी मिळाली आहे. श्रीरामपूर मधील गुन्हेगारी प्रवृत्ती वर नियंत्रण कसे ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे