अब्दुल भैय्या शेख सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने भेंडा येथे भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन.

संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा, दिनांक 21/03/2025
अब्दुल भैय्या शेख मित्र परिवार व
भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन.
नेवासा मतदारसंघात भेंडा येथे भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम!
अब्दुल भैय्या शेख मित्र परिवार व
भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला. कार्यक्रमाला महिलांची उंचांक गाठणारी गर्दी पाहायला मिळाली उपस्थित महिलांन कडून अब्दुल भैय्या शेख यांचे भरभरून कौतुक करण्यात आले अब्दुल भैय्या नेहमी आमच्या बहिणींसाठी भावाची भूमिका पार पाडतात असे मत महिलांनी व्यक्त केले.
मुख्य अतिथी : क्रांती नाना मळेगावकर यांच्या प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. अत्यंत उल्हासमय वातावरणात कार्यक्रम पार पडला अब्दुल भैय्या शेख मित्र परिवार व
भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती.
महीला सक्षमीकरण वर करत असलेल्या कामाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाल्याचे भैय्या सामाजिक प्रतिष्ठान चे मयुर कुलकर्णी व मकरंद राजहंस यांनी समाधान व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अशोक मोरे साहेब यांनि पाहुण्यांचे स्वागत केले अब्दुल भैय्या शेख यांच्या मातोश्री ग्रामपंचायत सदस्या हकीमाबी शेख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी भेंडा बु चे नवनिर्वाचित सरपंच सुहासिनीताई किशोर मिसाळ यांचा देखील सन्मान भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. तालुका युवक अध्यक्ष अभिराज अरगडे यांनी आभार व्यक्त केले. अब्दुल भैय्या शेख हे परदेशात असून देखील त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सुरेख असे नियोजन केले त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे अब्दुल भैय्या शेख यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अच्युतराव जाधव, आबासाहेब काळे, विलासराव देशमुख, संतोष औताडे-पञकार),बाबासाहेब नवथर, सतीश कावरे, सतीशराव गोडसे, सागर पंडित, अनिल गर्जे सर्पमित्र पुरुषोत्तम चिंधे आदी उपस्थित होते.
✅ माता-भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग!
✅ आनंदी आणि उत्साही वातावरण!
✅ सामाजिक एकता आणि मनोरंजनाचा अनोखा संगम!
या कार्यक्रमाने महिलांच्या आनंदाला उधाण आले आणि प्रत्येक स्पर्धकाने आत्मविश्वासाने सहभाग घेतला. उत्साह, मनोरंजन आणि सौहार्दाने भारलेला हा क्षण नेहमी लक्षात राहील!
महिलाशक्तीचा सन्मान, उत्सव आणि एकत्रित आनंद!
अनुभवायला मिळाला. अब्दुल भैय्या शेख प्रतिष्ठान ने केलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.