संपादकीय
Trending

पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते भेंडा येथे देवीची आरती नागेबाबा गृप चे केले कौतुक. 

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा                            दिनांक -14/10/2026.                नेवासा पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते भेंडा येथे देवीची आरती नागेबाबा गृप चे केले कौतुक.

 सविस्तर माहिती-नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील नागेबाबा गृप आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र महोत्सव 2026 च्या देवीची आरती नेवासा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आली. निर्मल ग्राम भेंडा बु येथील नागेबाबा गृप नेहमी सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी होत असतात.नागेबाबा गृप च्या वतीने तेलंगण राज्याच्या गोदावरी नदीच्या काठी असलेल्या प्रसिद्ध बासर येथील श्री ज्ञान सरस्वती माता मंदिर येथुन अमर ज्योत आणण्यासाठी 35 तरूण युवकांनी सुमारे 450 किमी अंतर पायी चालत पार केले हे अगदी कौतुकास्पद आहे असे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.

या आरती वेळी तरुण, महिला.लहन मुले,इतक्या मोठ्या संख्येने आरती साठी उपस्थित होते याबद्दल देखील कौतुक केले. नेवासा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेवासा पोलीस नेहमी कटीबद्ध असल्याची ग्वाही प्रताप दराडे यांनी दिली.येणाऱ्या काळात कितीतरी सर्वसामान्य माणूस पोलिस स्टेशन येथे आला तर त्याला चांगली वागणूक दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. देवीने आम्हाला चांगले काम करण्याची सद्बुद्धी व आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना यावेळी केली. या आरती नंतर नागेबाबा गृप कडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे साहेब, सरपंच नामदेव निकम, पञकार संतोष औताडे, नेवासा पोलीस स्टेशन चे साठे दादा, परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागेबाबा गृप च्या वतीने अध्यक्ष अशोक साळवे यांनी उपस्थितांचा सन्मान केला.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे