*राष्ट्रीय संत सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा चव्हाण (घोटी) यांचा पुण्याती सोहळा संपन्न* सविस्तर माहिती- राष्ट्रीय संत ब्रम्हलीन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा चव्हाण (घोटी) यांचा पुण्यतिथी सोहळा शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रबन मारोती मंदिर नारायण सृष्टी सोसायटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. *आजि सोनियाचा दिनू वरूषे अमृताचा धनु हरी पाहिला रे हरी पाहिला* या संतांच्या वचना प्रमाने श्री गुरूंचा सद्गुरू च्या कृपा अमृता चा वर्षाव करणारा तसेच आत्मज्ञानाचा बोध देऊन सत्याचा भक्तिमार्ग दाखवणारा हा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
छत्रपती संभाजी नगर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात सद्गुरू एकनाथ महाराज सायकड बाबा व हभप साहेबराव गव्हाणे महाराज यांचे संतपुजन यावेळी करण्यात आले. या पुण्यतिथी सोहळ्यात सुरवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथपूजन , कलशपूजन, विनापूजन ,व संत प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी हभप भाग्यश्री ताई गारूळे यांचे प्रवचन झाले तसेच हभप परमेश्वर महाराज गारूळे यांचे किर्तन झाले त्यानंतर हरी किर्तन गुरूवर्य सद्गुरू एकनाथ महाराज सायकड बाबा यांनी केले. यावेळी चक्रि प्रवचन तसेच सामुहिक हरिपाठ घेण्यात आला. मा कृष्णा गव्हाणे ( चेअरमन विठ्ठल अर्बन पतसंस्था) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. चंद्रकांत साबळे महाराज ,लहुभाऊ गांरूळे, भागवत महाराज डुबे, या सोहळ्याप्रसंगी अशोक भाऊ मंजुळे, बाबुराव भाऊ मंजूळे, रोहन भाऊ , ज्ञानेश्वर महाराज गांरूळे, अशोक भाऊ,कचरूभाऊ बर्वे, अर्जुनभाऊ शिंदे,महादेव भाऊ व सर्व साधक भाऊ व ताई, यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. राष्ट्रीय संत ब्रम्हलीन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा चव्हाण (घोटी) यांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हभप साहेबराव महाराज गव्हाणे यांनी प्रास्ताविक करून या सोहळ्याचे महत्व सांगितले.