नेवासा पोलीस ठाणे व दंगल नियंत्रण पथक (RAF) यांच्या संयुक्त विद्यमाने रूटमार्च चे आयोजन.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा. दिनांक 21/03/2025
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यात नेवासा पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी 11:00 वाजता नेवासा शहरातुन रूट मार्च आणि फ्लॅग मार्च ची सुरुवात करण्यात आला होता.
आगामी राम नवमी, ईद व आंबेडकर जयंती बंदोबस्त शांततेत पार पाडण्यासाठी व जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करणे व गुन्हेगारांवर धाक निर्माण करणे यासाठी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूटमार्च घेण्यात आला. सदरचा रूटमार्च आज
*010.30* वा नेवासा शहर येथे आगमन झाले.
*10.30 ते 11.15* नेवासा गावामध्ये रूट मार्च
*11.45* कुकाणा येथे आगमन झाले.
*11.45* ते 12.15 रूट मार्च
*12.45* नेवासा फाटा येथे आगमन
*12.45 ते 1.00* वाजेपर्यंत नेवासा फाटा येथे रूट मार्च करण्यात आला.
या रूटमार्च चे नेतृत्व 102 बटालियन, द्रुत कार्य बल (RAF) च्या सहायक कमांडंट श्रीमती प्रियंका सिंह परीहार मॅडम यांनी केले. त्यांच्या सोबत निरीक्षक श्री. दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी श्री. धनंजय गुजर, तसेच 34 पोलीस कर्मचारी सहभागी झाले.
*नेवासा शहरातील रूट मार्च:*
मळगंगा मंदिरापासून सुरू झालेल्या या रूट मार्च ने गणपती चौक, नगरपंचायत, लोखंडी गल्ली, खाटीक मोहल्ला, भराव गणपती, हनुमान मंदिर, औदुंबर चौक, आणि मापारी किराणा मार्गे मार्गक्रमण केले.
*कुकाना रूट मार्च:*
कुकाण्यात राजमुद्रा चौकापासून आंबेडकर चौक मार्गे नेवासा रोडपर्यंत रूट मार्च आयोजित करण्यात आला आणि मार्च चा समारोप रोस लँड शाळेजवळ झाला.
या फ्लॅग मार्चा चा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस प्रशासन आणि द्रुत कार्य बलाच्या तत्परतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
द्रुत कार्य बल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून पार पडलेली ही विशेष मोहीम शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.
