राष्ट्रवादी चे नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण धारकांचा नेवासा तहसील कार्यालय येथे मोर्चा

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा. दिनांक -11/02/202
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली कुकाणा,भेंडा येथील व्यापारी व अतिक्रमण धारकांचा नेवासा तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला होता. कुकाणा येथील राज्य मार्ग रुंदीकरण दहा मिटर
पेक्षा अंतर कमी करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे
युवा नेते अब्दुल भैय्या शेख यांचे नेतृत्वाखाली नेवासा तहसील कार्यालय येथे मुक मोर्चा
काढण्यात आला. कुकाणा येथील अंतराचा खुलासा
कारणे, दहा मिटर चे अंतर कमी करणे, अतिक्रमण धारक
व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करुन कुकाणा
व्यापारपेठेला नवसंजीवनी देणेबाबत नेवासा येथील नायब
तहसीलदार किशोर सानप साहेब यांच्या सोबत चर्चा केली.
पंधरा मीटर मधील अतिक्रमण ऐवजी दहा मीटर पर्यंत
अतिक्रमण काढावे यासंदर्भात नायब तहसीलदार किशोर सानप
यांच्या बरोबर युवा नेते अब्दुल भैय्या शेख आणि अतिक्रमण धारक
व्यापारी यांनी सविस्तर चर्चा केली. कुंकाणा येथील
अतिक्रमण दहा मीटर पर्यंत काढण्यात यावे या करिता अतिक्रमण धारकांचा व अब्दुलभैय्या शेख हे जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढणार आहे. परिसरातील
हजारो कुटुंबाची गुजराण उधोग धंदा करून या
रस्त्यालगत असणाऱ्या दुकानादार व्यापारी आणि
त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा.
भेंडा कुकाणा येथील साईड गटार बाहेर असणारे
व्यापारी दुकान अतिक्रमण चौपदरी रस्ता मंजुरी येऊ
पर्यंत राहू द्यावे. सुमारे हजार ते बाराशे व्यापारी आणि
त्यांचे कुटुंब उपजीविका करिता या दुकानावर अवलंबून
आहे. या व अतिक्रमण धारकांची उपजीविका अवलंबून आहे अगदी लहान उधोगापासुन मोठ्या उधोगा पर्यंत सर्व व्यापारी वर्ग या मोर्चात सहभागी झाले होते. येणाऱ्या काळात सर्व अतिक्रमण धारकांचा विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा अहिल्या नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येईल असे अब्दुल भैय्या शेख यांनी सांगितले.